पुण्यासह राज्यात टिपू सुलतानविषयीच्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपकडून आंदोलने !

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवराय आणि टिपू सुलतान समपक्ष असल्याचे वक्तव्य केल्याचे प्रकरण

छायाचित्र सौजन्य : ABP माझा

पुणे – पुणे, नाशिक, नागपूर, मालेगाव, मुंबई आणि सांगली येथे भाजपच्या कार्यकर्त्यांकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात आंदोलने करण्यात आली. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतानशी करून ते त्याच्या समकक्ष असल्याचे म्हटले होते. मालेगाव महापालिकेत उपमहापौरांच्या दालनात मुसलमान महिला महापौरांनी टिपू सुलतानचे छायाचित्र लावले आणि त्याचे समर्थन केले होते. या प्रकरणी त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली होती.

पुणे येथील काँग्रेस भवनासमोर भाजपचे आक्रमक आंदोलन !

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवराय आणि टिपू सुलतान याचे कार्य समकक्ष असल्याचे वक्तव्य केले होते. या िवरोधात भाजपने पुणे येथे काँग्रेस भवन बाहेर दीड ते दोन घंटे आंदोलन केले. या वेळी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आली. यामध्ये काही चारचाकीच्या काचा फुटल्या आहेत, तर एका काँग्रेसच्या कार्यकर्त्याला दगड लागला. या वेळी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाले असून त्यांनीच दगडफेक केल्याचा आरोप भाजपने केला आहे. पोलिसांनी गोंधळ घालणार्‍या काही कार्यकर्त्यांना कह्यात घेतले.

‘काँग्रेसने भाजपच्या महापौरांना अटक करावी, त्यांनी महापौरपदाचे त्यागपत्र द्यावे’, अशी मागणी केली आहे, तसेच काँग्रेसने भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटेंना अटक करण्याचीही मागणी केली आहे.

या प्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना कुणाशी होऊ शकत नाही. ‘टिपू सुलतान खलनायक होता, हे हर्षवर्धन सपकाळांना सांगणार का ? त्यांचा उदोउदो करू नका’, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी त्या संदर्भात दिली.

मालेगाव महानगरपालिकेमध्ये उपमहापौरांनी टिपूचे चित्र भिंतीवर लावल्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी वरील चित्र लावण्यासाठी त्यांना भेट दिले.

सोलापूर – शिवद्रोही नेत्याच्या तोंडाला जो कुणी काळे फासेल, त्याला १ लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल, अशी घोषणा मराठा ठोक मोर्चाचे सोलापूर समन्वयक श्री. महेश डोंगरे यांनी केली आहे, तर अन्य एका ठिकाणी ‘सपकाळ यांची जीभ छाटली, तर १० सहस्र रुपये देऊ’, अशी वक्तव्ये करण्यात आली. मालेगाव येथे महानगरपालिकेसमोर सपकाळ यांचा पुतळा जाळण्यात आला.

या पार्श्वभूमीवर माजी राज्यपाल भगतसिंह कोशारी हे टिपू सुलतानचे कौतुक करत असल्याचा व्हिडिओ काँग्रेसने प्रसारित केला आहे.


नराधम टिपूचे उदात्तीकरण खपवून घेणार नाही ! : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वज्रनिर्धार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर – ज्या क्रूरकर्मा टिपू सुलतानने सहस्रो हिंदूंची कत्तल केली, मंदिरे फोडली आणि हिंदूंचे बळजोरीने धर्मांतर केले, अशा नराधमाची तुलना साक्षात् ‘हिंदवी स्वराज्य संस्थापक’ छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करण्याचे नीच कृत्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे. नराधम टिपूचे उदात्तीकरण खपवून घेणार नाही. सपकाळ यांना लाज वाटली पाहिजे आणि त्यांनी त्वरित क्षमा मागावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या आर्यावर्तात धर्माचे रक्षण करण्याचे अद्वितीय कार्य छत्रपती शिवरायांनी केले. त्यांनी मुगलांच्या जोखडातून सामान्य रयतेला मुक्त करून ‘स्वराज्य’ स्थापन केले. दुसरीकडे टिपू सुलतान आहे, ज्याने रक्ताच्या नद्या वहावल्या आणि लाखो हिंदूंचे शिरकाण केले. अशा नराधमाची तुलना राष्ट्रपुरुषांशी करणे, हे पाप आहे. टिपू आणि शिवराय यांना समान मानणे, हे केवळ मतांच्या राजकारणासाठी केलेले ‘पादत्राणे चाटण्याचे’ (जोडे चाटण्याचे) नीच प्रकार आहेत. असे लांगूलचालन आम्ही या जन्मात तरी कधी पाहिले नाही. जर काँग्रेसमध्ये थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल, तर त्यांनी सपकाळांच्या या विधानावर आपली भूमिका स्पष्ट करावी.

सपकाळांची कोलांटउडी 

(म्हणे), ‘वक्तव्याची मोडतोड झाली !

चहुबाजूंनी टीका झाल्यावर आणि पुणे येथे गुन्हा नोंद झाल्यावर सपकाळांनी नेहमीप्रमाणे कांगावा चालू केला आहे. ‘माझ्या वक्तव्याची मोडतोड करून ‘ध चा मा’ करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत’, असा आरोप त्यांनी ‘एक्स’ (ट्विटर) द्वारे केला आहे. (स्वतः गरळ ओकायची आणि हिंदू संघटित झाले की, ‘दंगली’चा बागुलबुवा उभा करायचा, ही काँग्रेसची जुनीच खोड आहे ! – संपादक)

हिंदूंवर अत्याचार करणारा टिपू शिवरायांच्या नखाचीही सर धरू शकणार नाही. काँग्रेसला आता औरंगजेब आणि टिपूच आपले वाटू लागले आहेत.’ – भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण


या शिवद्रोही विधानाचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढलेले वाभाडे !

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारले ते न्याय, स्त्रीसन्मान आणि लोककल्याण यांच्या भक्कम तत्त्वांवर! इतिहासात टिपू सुलतानच्या कारकीर्दीविषयी अनेक ठिकाणी धार्मिक अत्याचार, बळजोरीने धर्मांतर आणि क्रूर दडपशाहीचे उल्लेख आढळतात. याला केवळ आपल्या लांगूलचालनाच्या स्वार्थी राजकारणासाठी स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष म्हणणे, याहून नीचपणाचे अधिक काय असेल ? काँग्रेसचे लांगूलचालनाचे राजकारण आणखी किती नीच पातळी गाठणार ? मतांसाठी आणि तुष्टीकरणासाठी इतिहासाचे विकृतीकरण करणे हा अत्यंत घृणास्पद प्रकार आहे. छत्रपतींच्या तेजस्वी कार्याची तुलना टिपू सुलतानाशी करणे हा छत्रपती शिवरायांचा, महाराष्ट्राचा आणि जगभरातील प्रत्येक शिवप्रेमीचा घोर अपमान आहे. राष्ट्रभक्त भारतियांचाही तो अपमान आहे.


इतिहासाशी तडजोड करणार्‍यांना महाराष्ट्राची जनता योग्य जागा दाखवेल ! – चित्रा वाघ, आमदार, भाजप

छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांना समकक्ष ठरवणे, हे केवळ ऐतिहासिक अज्ञान नसून महाराष्ट्राच्या अस्मितेवर झालेले थेट आक्रमण आहे. बळजोरीने धर्मांतर करणार्‍या राजवटीचे प्रतिनिधित्व करणार्‍या टिपूशी शिवरायांची तुलना करणे हा इतिहासाचा घोर अपमान असून अशा प्रवृत्तीला महाराष्ट्रात रहाण्याचा नैतिक अधिकार नाही. काँग्रेसने सपकाळ यांना तात्काळ बडतर्फ करावे. या वादात उद्धव ठाकरे यांना उद्देशून त्या म्हणाल्या की, कथित हिंदुत्वाच्या व्याख्येत हा अपमान बसतो का ? घराबाहेर पडा आणि महाराष्ट्राच्या जनतेला उत्तर द्या.


हर्षवर्धन सकपाळ यांचे डोके ठिकाणावर आहे का ? – नवनाथ बन, भाजप माध्यम प्रमुख

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे डोके ठिकाणावर आहे का ? ज्या टिपू सुलतानने सहस्रो हिंदूंवर अत्याचार केले, शेकडो मंदिरे लुटली आणि महिलांचा अनन्वित छळ केला, अशा खलनायकाची तुलना हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणे हा निव्वळ मूर्खपणा आणि इतिहासाचे विकृतीकरण आहे; ज्या टिपूने स्वराज्याची हानी केली, त्याला हिरो बनवण्याचा काँग्रेसचा हा प्रयत्न केवळ मतांच्या लांगूलचालनासाठी असून महाराष्ट्र आणि देश टिपूला कधीही नायक मानणार नाही.


८ राज्ये मुसलमानबहुल झाली, तरीही हिंदू जागेच व्हायला सिद्ध नाहीत ! – शरद पोंक्षे, ज्येष्ठ अभिनेते

अभिनेते शरद पोंक्षे

मुंबई – भारत स्वतंत्र होऊन ७८ वर्षे झाली आहेत. मुसलमान राष्ट्र मिळाल्यानंतर उरलेला एक अख्खा देश, जो हिंदूंचा न होता सर्वधर्मसमभावाचा झाला. त्यातही ८ राज्ये मुसलमान बहुसंख्य झाली. पुन्हा एकदा ७८ वर्षांनंतर वर्ष १९४७ प्रमाणे परिस्थिती आणली गेली आहे. ‘टिपू सुलतानचे चित्र लावल्यानंतरही हिंदू जागेच व्हायला सिद्ध नाहीत, अशी वेदना ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केली.

मी कुठेतरी वाचले आहे की, वर्ष १९४७ मध्ये देश स्वतंत्र झाला नाही, तर देशाचे तुकडे व्हायला प्रारंभ झाला. तो पहिला टप्पा होता. आता दुसर्‍या टप्प्यात आपण आलो आहोत. प्रत्येक ७५ वर्षांनी भारताचा एक-एक तुकडा पडत आहे आणि तरीही हिंदू जागृत होत नाहीत. उपमहापौर निहाल अहमद यांनी त्यांच्या दालनात क्रूरकर्मा आणि धर्मांध टिपू सुलतान याचे चित्र लावले. याविषयी शरद पोंक्षे यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.


टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवराय यांच्याशी हीच जिहादी मानसिकता ! – नीतेश राणे, मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री

नितेश राणे, मत्स्यपालन मंत्री

मुंबई – ज्या टिप्याने ( टिपू सुलतान याने) लाखो हिंदूंचे धर्मांतर केले. मंदिरे तोडली. केवळ इस्लाम वाढवण्याकडे लक्ष दिले. तो आमच्या छत्रपती शिवराय यांच्या जवळपासही येऊ शकत नाही. टिप्याची (टिपू सुलतान याची) तुलना छत्रपती शिवराय यांच्याशी करणे, यालाच जिहादी मानसिकता म्हणतात, असा संताप राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नीतेश राणे यांनी व्यक्त केला. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना धर्मांध क्रूरकर्मा टिपू सुलतान याच्याशी केली. त्यावरून नीतेश राणे यांनी त्यांच्या ‘एक्स’ खात्यावरून वरील संदेश प्रसारित केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी स्वत:च्या कार्यालयात शिवरायांचे चित्र काढून टिप्या (टिपू सुलतान) याचे चित्र लावून दाखवावे, मग बघू शिवरायांचे मावळे त्यांना महाराष्ट्रात कसे फिरू देतात, अशी चेतावणी नीतेश राणे यांनी या संदेशात दिली आहे.

संपादकीय भूमिका :

  • इतिहास पुसण्याचा किंवा विकृत करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून सातत्याने होत आहे. टिपू सुलतान हा केवळ धर्मांध आक्रमक होता, हे सिद्ध झालेले असतांनाही त्याला ‘शूर’ ठरवणे, हा छत्रपती शिवरायांच्या दैदीप्यमान इतिहासाचा घोर अवमान आहे. अशा नेत्यांना जनता निवडणुकीत योग्य तो धडा शिकवेलच !
  • छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदूंचे आराध्य दैवत आहेत. त्यांची तुलना कोणत्याही धर्मांध आक्रमकाशी करणे, हे केवळ राजकीय सूत्र नसून हिंदु अस्मितेवर केलेला घाला आहे.‘वक्तव्याचा विपर्यास झाला’, असे म्हणण्यापेक्षा सपकाळांनी जाहीर क्षमा मागितली पाहिजे. हिंदूंचा अवमान करणार्‍या अशा नेत्यांना समाजाने बहिष्कृत करणेच योग्य ठरेल !