|

वशेणी (उरण) – येथील समुद्रकिनारी वाळू बंदराजवळील श्राद्धविधीसाठी स्थापण्यात आलेली शिवपिंडीची ११ फेब्रुवारीच्या रात्री तोडफोड करण्यात आली. ही तोडफोड धर्मांधांनी केल्याचा संशय गावकर्यांना आहे. ‘गावातील कुणी व्यक्ती असे करू शकत नाही’, असे गावकर्यांचे ठाम मत आहे. काही दिवसांपूर्वी याच पिंडीवर मानवी विष्ठा फासून तिची विटंबना केल्याचे दृष्टीस पडले होते. गावातील एका हिंदुत्वनिष्ठ मुलाने त्या वेळी ही पिंड स्वच्छ केली होती.
🛕 Attack on Faith in Raigad – Silence from Authorities
In Vasheni (Raigad district), a sacred Shivpindi was desecrated just days before #Mahashivratri
Villagers suspect fanatic elements are behind this shameful act.
There are serious allegations that instead of swiftly… pic.twitter.com/LLK6hYILmm
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 14, 2026
या घटनेनंतर ३ दिवसांनी महाशिवरात्र असल्याने २ पोलीस येथे सुरक्षेसाठी आले होते. ‘ही तोडफोड कुणी केली ?’ याचा शोध घेऊन त्याला शिक्षा करण्याऐवजी ही घटना लपवून ठेवण्याकडे पोलिसांचा कल असल्याचे त्यांच्या बोलण्यातून गावकर्यांच्या लक्षात आल्याने गावकर्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
पोलीस गावातील मनोरुग्ण बाईने हे कृत्य केल्याचे मनानेच सांगून आरोपींना एकप्रकारे पाठीशीच घालत आहेत. प्रत्यक्षात ही मनोरुग्ण बाई गावातील एका मंदिरात रहात असून ती तेथील स्वच्छता करते आणि देवाला फुलेही वाहते. त्यामुळे ‘ती असे कृत्य करू शकत नाही’, असे गावकर्यांनी सांगितले.
(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)
पोलिसांकडे चौकशी केली असता सारवासारव आणि प्रकरण दाबण्याचा प्रयत्न !पोलिसांकडे ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराने चौकशी केली असता, ते म्हणाले, ‘‘गावात कुणी वेडी बाई आहे, तिने हे कृत्य केले असावे. यात बातमी देण्यासारखे एवढे काही नाही.’’ (उद्या हिंदूंवर आक्रमण झाले, तरी पोलीस असेच म्हणतील, हे या प्रसंगातून हिंदूंनी ध्यानात घ्यावे आणि स्वरक्षण प्रशिक्षण घ्यावे ! – संपादक) गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री. अविनाश पाटील यांनी ती शिवपिंडी आणि चौथरा बांधला आहे. त्यामुळे ‘सनातन प्रभात’ माध्यमांच्या वार्ताहराने या प्रसंगाची माहिती मिळवण्यासाठी श्री. अविनाश पाटील यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा त्यांच्या पत्नी सौ. पाटील म्हणाल्या, ‘‘पोलिसांनी ‘या गोष्टीचा जास्त प्रचार करू नका’, असे त्यांना सांगितले. त्यामुळे गावतील लोकांना पोलिसांचा पुष्कळ राग आला.’’ |
संपादकीय भूमिका
|
Temple Land Protection Movement : ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ला स्थगिती !
Bhangar Blast : बंगालमधील भांगर बाँबस्फोट प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा माजी आमदार शौकत मोल्ला यास अटक
नेरूळ (नवी मुंबई) येथील रुग्णालयाच्या वसतीगृहातील हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती धर्मांध ख्रिस्ती युवतीने फेकून दिल्या !
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
नागपूर येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीवरील सोन्याची साखळी चोरणार्या ३ धर्मांधांना अटक !