सक्तीच्या धर्मांतरावर न्यायालये आणि पोलीस यांचे मौन

कराची (पाकिस्तान) : पाकिस्तानच्या सिंध प्रांतात अल्पसंख्य हिंदूंच्या विरोधात संघटित आणि सुनियोजित मोहीम राबवली जात आहे. अल्पवयीन मुलींचे अपहरण, त्यांचे बलपूर्वक धर्मांतर आणि त्यानंतर विवाहासाठी दबाव, असे प्रकार सातत्याने घडत आहेत. भील, मेघवार आणि कोल्ही यांसारख्या अतिशय गरीब आणि सामाजिकदृष्ट्या उपेक्षित हिंदु समाजातील मुलींना लक्ष्य केले जाते. याचे प्रमुख कारण म्हणजे अशा कुटुंबांना दीर्घ कायदेशीर लढाई लढणे शक्य नसते आणि माध्यमे किंवा सत्ताकेंद्रांपर्यंत त्यांची पोचही नसते. दर्गे आणि मदरसे यांच्याशी संबंधित जाळ्याच्या माध्यमातून हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. पीर सरहिंदी दर्ग्याशी संबंधित लोकांनी दावा केला आहे की, तेथे आतापर्यंत सुमारे १ सहस्र हिंदु मुलींचे धर्मांतर करण्यात आले आहे.
ही संपूर्ण प्रक्रिया बहुतेक वेळा थेट अपहरणाने किंवा भीती आणि दबाव यांद्वारे होते. अल्पवयीन मुलींना विवाह, नोकरी किंवा आर्थिक सुरक्षिततेची खोटी स्वप्ने दाखवली जातात. अनेक वेळा धमक्या दिल्या जातात आणि हतबलतेने घर सोडायला भाग पाडले जाते. त्यानंतर लगेचच मुलींना त्यांच्या जिल्ह्याबाहेर नेले जाते. हा जलद स्थलांतराचा उद्देश असा असतो की, मुलीचा कुटुंबाशी संपर्क तुटावा, तिला कोणत्याही अधिवक्त्यांपर्यंत किंवा सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत पोचता येऊ नये आणि स्थानिक माध्यमांचे लक्षही या प्रकरणाकडे जाऊ नये.
🚨 Forced Conversions of Hindus in Pakistan 🚨
🔥 State-Sanctioned Silence = Complicity 🔥
🔇 Courts & Police Look Away:
Judiciary and law enforcement in Pakistan continue to shield perpetrators of forced conversions.❗ No Protection. No Justice. No Future.
If this… pic.twitter.com/yc0nCRKVQG— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 23, 2026
मशीद, दर्गे आणि मदरसे यांमध्ये धर्मांतर
धर्मांतर प्रामुख्याने काही विशिष्ट मशिदी, दर्गे किंवा मदरसे यांच्याशी जोडलेल्या ठिकाणी केले जाते. या संपूर्ण प्रक्रियेत कट्टरपंथी संघटनांशी संबंधित जाळे सक्रीय भूमिका बजावते आणि सर्व काही नियोजित पद्धतीने पुढे नेले जाते. या पद्धतीतील आणखी एक गंभीर भाग म्हणजे कागदपत्रांमध्ये फेरफार. बनावट ओळखपत्रे बनवली जातात, ज्यामध्ये अल्पवयीन मुलींचे वय वाढवून त्यांना प्रौढ दाखवले जाते.
बालविवाह कायद्याला बगल
या पालटलेल्या कागदपत्रांचा वापर सिंधमधील बालविवाह कायद्यांना बगल देण्यासाठी केला जातो. धर्मांतरानंतर अवघ्या ३-४ दिवसांत मुलीचा विवाह लावून दिला जातो. अनेकदा हा निकाह वयस्क व्यक्तीशी किंवा आधीच विवाह झालेल्या पुरुषाशी लावला जातो. अशा प्रकारे संपूर्ण प्रकरण कायदेशीर असल्याचा देखावा निर्माण केला जातो.
आरोपींच्या बाजूने पाकिस्तानची न्यायव्यवस्था
न्यायालयीन प्रक्रिया ही समस्या अधिक गंभीर बनवते. अनेक वेळा पीडित मुलींचे जबाब दबावाखाली नोंदवले जातात. तरीसुद्धा पोलीस आणि न्यायालये ‘स्वेच्छेने धर्मांतर’ या दाव्यांचे सखोल अन्वेषण न करता मान्यता देतात. एकदा न्यायालयाने धर्मांतराला मान्यता दिली की, तो निर्णय पालटणे जवळजवळ अशक्य होते. त्यामुळे पीडित आणि तिच्या कुटुंबासाठी कायदेशीर मार्ग जवळपास बंद होतात.
पाकिस्तानमध्ये अशी व्यवस्था निर्माण झाली आहे की, जिथे कायदेशीर त्रुटी आहेत, सामाजिक दुर्बलता आहे आणि प्रशासन एकतर उदासीन आहे किंवा कट्टरपंथी आरोपींच्याच बाजूने उभे राहिलेले दिसते. परिणामी अल्पसंख्यांक मुली अशा चक्रात अडकतात, ज्यातून बाहेर पडणे अत्यंत कठीण होते. त्याहूनही कठीण म्हणजे या प्रकारांना कायदेशीर आव्हान देणे. पाकिस्तानमध्ये अशा प्रकरणांची मोठ्या प्रमाणावर नोंद आहे.
धर्मांतरानंतर ७ मुलांच्या वडिलांशी अल्पवयीन हिंदु मुलीचा विवाह
ऑक्टोबर २०२५ मध्ये सिंध प्रांतात एका १५ वर्षांच्या अल्पवयीन हिंदु मुलीचा ७ मुलांच्या वडिलांशी विवाह लावण्यात आला होता. ही मुलगी मुकबधिर होती आणि तिचे इस्लाममध्ये धर्मांतर करण्यात आले होते. मुलीच्या वडिलांनी आरोप केला की, त्यांची मुकबधिर मुलगी कधीही एका अमली पदार्थ तस्कर आणि ७ मुलांचा बाप असलेल्या व्यक्तीशी विवाह करण्यास सिद्ध होऊ शकत नाही. तिच्यावर बळजोरी करण्यात आली. पाकिस्तानात हिंदू आणि अल्पसंख्य यांच्या हक्कांसाठी काम करणार्या शिव कच्छी यांनी सांगितले की, अपहरणाविषयी तक्रार देऊनही पोलिसांनी कुटुंबियांच्या अर्जावर कारवाई केली नाही.
‘शिकायचे असेल, तर मुसलमान व्हा’च्या धमक्या
पाकिस्तानमधील कट्टरतेची पातळी इतकी आहे की, हिंदु मुलींना शिक्षण घेण्यासाठीही शाळांमध्ये इस्लाम स्वीकारण्याचा दबाव टाकला जात आहे. डिसेंबर २०२५ मध्ये सिंध प्रांतातील मीरपूर सकरो येथील एका सरकारी उच्च माध्यमिक शाळेत हा प्रकार उघडकीस आला. काही हिंदु विद्यार्थिनींच्या पालकांनी सांगितले की, शाळेच्या मुख्याध्यापिकेने त्यांच्या मुलींना शिक्षण चालू ठेवायचे असेल, तर इस्लाम स्वीकारण्यास सांगितले होते. पालकांचे म्हणणे आहे की, विद्यार्थिनींना कलमा (अल्लाचा गौरव करणारी विधाने) म्हणण्यास भाग पाडण्यात आले आणि हिंदु धर्माची थट्टा करण्यात आली. नकार दिल्यावर काही विद्यार्थिनींना शाळेतून घरी पाठवण्यात आले.
| Pakistan’s Stolen Daughters: The Hidden Horror of Forced Conversion | Statecraft | Episode 129
(सौजन्य : India Today Global) |
१२ वर्षांत १४ सहस्र हिंदु मुलींचे अपहरण आणि धर्मांतर
सिंधमधील हिंदूंची परिस्थिती इतकी भयावह आहे की, कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तान सोडण्याची इच्छा अनेक जण व्यक्त करत आहेत. भारताचा व्हिसा न मिळाल्याने हिंदु समाजातील काही लोकांनी आत्महत्या केल्याची प्रकरणेही समोर आली आहेत. वर्ष २०२३ मध्ये सिंधमधील ‘गाडिया लुहार सहाय्यता समिती’चे अध्यक्ष मांजी लुहार उपाख्य काका यांनी सांगितले होते की, मागील ६ महिन्यांत त्यांच्या ४ परिचित हिंदूंनी आत्महत्या केली.
सामाजिक कार्यकर्ते रोशन भील यांचे म्हणणे आहे की, प्रत्येक हिंदु कुटुंब स्वतःचे भूतकाळ विसरू इच्छिते; मात्र तसे होत नाही. पाकिस्तानमध्ये गेल्या १२ वर्षांत १४ सहस्र हिंदु मुलींचे अपहरण, बलपूर्वक धर्मांतर आणि सामूहिक बलात्कार यांच्या घटना समोर आल्या आहेत.
संपादकीय भूमिकापाकमधील हिंदूंचे रक्षण आतापर्यंत झाले नाही आणि आताची स्थिती पहाता पुढेही होण्याची शक्यता नाही. त्यामुळे भविष्यात ‘पाकमध्ये हिंदूही रहात होते’, असेच म्हणावे लागणार आहे ! |
शहरी नक्षलवादामुळे झारखंड येथील आदिवासींचे अस्तित्व धोक्यात !
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकतांना पकडलेल्या युवकाची आत्महत्या
‘एक भक्कम पाकिस्तान अमेरिकेच्या हितासाठी अत्यंत आवश्यक !’ – अमेरिका