रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेचा आश्रम पाहून मान्यवरांनी दिलेले अभिप्राय !
‘आश्रमात सात्त्विकता आणि स्वच्छता आहे. हा आश्रम वैदिक हिंदुधर्माचा पाया आहे. येथे विज्ञान आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम आहे. येथील शिस्त, साधकांचा प्रामाणिकपणा, भक्ती आणि पाहुण्यांप्रती असणारा भाव या गोष्टी वाखाणण्यासारख्या आहेत.