रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

गोवा येथील सनातनचा रामनाथी आश्रम

१. ‘आश्रमातील सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन ! हे प्रदर्शन पाहिल्यावर ‘एखाद्या वस्तूवर अनिष्ट शक्तीचा परिणाम कसा होऊ शकतो ?’, हे मला समजले. प्रदर्शनात ठेवलेले साहित्य पाहून मी प्रभावित झाले.’ – अधिवक्त्या (सौ.) स्वराग्नी मूर्ती, बेंगळुरू, कर्नाटक. (१२.६.२०२२)

२. ‘सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन अद्वितीय आहे. मी यापूर्वी अशा प्रकारच्या प्रदर्शनाविषयी ऐकले नव्हते आणि कल्पनाही केली नव्हती.’ – अधिवक्त्या (सौ.) रचना नायडू, दुर्ग, छत्तीसगड. (१३.६.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला सूक्ष्म-जगत् असे संबोधतात.