
१. ‘आश्रम पाहून मला पुष्कळ चांगले वाटले. मी आश्रमाच्या सर्वांगीण यशाची इच्छा करतो.’
– श्री. नोनी गोपाल पतरी (संस्थापक, हिंदु सहायता समिती), दुर्गापूर, बंगाल. (१३.६.२०२२)
२. ‘आश्रमातील वातावरणात पावित्र्य असल्याची मला जाणीव झाली. आश्रमात आल्यावर माझ्या मनाची प्रसन्नता वाढली.’
– श्री. व्यंकटेश यशवंतराव शिंदे (हमारा देश, कोर कमिटी मेंबर), बेळगाव, कर्नाटक. (१६.६.२०२२)
३. ‘आश्रम पाहून माझे मन शांत झाले. येथे मला पुष्कळ ज्ञान मिळाले. त्याचे वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतील.’
– श्री. परशुराम नामदेव गावडे (अध्यक्ष, श्री कमलेश्वर शिक्षक प्रसारक संस्था), पेडणे, गोवा. (१६.६.२०२२)
४. ‘आश्रमामध्ये मला सात्त्विकता जाणवली. येथे आल्यावर देवाप्रती प्रेम आणि भाव वाढल्यामुळे माझी पुष्कळ भावजागृती झाली.’
– अधिवक्ता प्रमोद हेदे, मडगाव, गोवा. (१६.६.२०२२)
५. ‘आश्रमात आल्यानंतर ‘आपण देवभूमीत आणि देवलोकात आलो आहोत’, असे मला वाटत होते.’
– श्री. सुरेश भाऊसो यादव (उपसरपंच, शिवसेना), शिरोली, जिल्हा कोल्हापूर. (१६.६.२०२२)
६. ‘आश्रम अतिशय स्वच्छ आणि सुनियोजित असून वाखाणण्याजोगा आहे. आश्रम सकारात्मक ऊर्जेने (चैतन्याने) भरलेला आहे.’
– अधिवक्त्या (सौ.) स्वराग्नी मूर्ती, बेंगळुरू, कर्नाटक. (१२.६.२०२२)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवांच्या चित्रांमध्ये देवींच्या चित्रांपेक्षा अधिक प्रमाणात प्रभावळ वाढल्याचे दिसून येण्यामागील अध्यात्मशास्त्र !
साधकाची नेमकी अडचण जाणून त्यावर अचूक उपाययोजना सांगून त्याला घडवणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि त्यांच्या पत्नी आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे यांच्या सत्संगात दिग्रस (जिल्हा यवतमाळ) येथील साधिकांना आलेल्या अनुभूती !
सनातन संस्थेच्या वतीने मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती !