१. रामनाथी आश्रम निश्चितच हिंदु राष्ट्राचा केंद्रबिंदू होईल !
‘आश्रमात आल्यानंतर माझ्या मनाला पुष्कळ शांती जाणवली आणि आतून पुष्कळ चांगले वाटले. मला एक सकारात्मक ऊर्जा आपोआपच मिळत गेली. आश्रम स्वतःच अध्यात्माचे एक ज्ञानकेंद्र आहे. रामनाथी आश्रम निश्चितच हिंदु राष्ट्राचा केंद्रबिंदू होईल.’- अधिवक्ता आलोक तिवारी (उपाध्यक्ष, जांबाज हिंदुस्तानी सेवा समिती), उत्तरप्रदेश. (१३.६.२०२२)
२. आश्रमात आल्यावर ‘आपण साक्षात् नारायणाच्या धामात पोचलो आहोत’, असे जाणवले !
‘आश्रम पाहून माझे मन भावविभोर झाले. जणूकाही ‘आपण साक्षात् नारायणाच्या धामात पोचलो आहोत’, असे मला जाणवले. ‘आश्रमात असेच चांगले कार्य उत्तरोत्तर होत रहावे, ज्यामुळे आम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळू शकेल’, अशी देवाचरणी प्रार्थना !’ – सौ. बीना ठाकूर, जिल्हा मंडला, मध्यप्रदेश. (१४.६.२०२२)
३. आश्रम पाहून मला आपला महान धर्म अणि संस्कृती यांचा अभिमान वाटला !
‘आश्रम पाहून मला आपला महान धर्म अणि संस्कृती यांचा अभिमान वाटला. आश्रम अतिशय सुंदर, प्रेरणादायी आणि सुव्यवस्थित आहे. आश्रमातील साधकांचे आचरण अत्यंत आत्मीयतेचे आहे. त्यांची गुरुनिष्ठा पाहून मनाला प्रसन्न वाटले. येथे ईश्वराची कृपा प्रत्यक्षात साकार झाल्याचे मला दिसले.’
– डॉ. सत्यमेव जयते (संस्थापक, सत्यमेव जयते), उत्तरप्रदेश
४. ‘या वर्षी आश्रम पहातांना माझ्या आनंदात वृद्धी झाली. ‘आश्रमाची सात्त्विकताही वाढली आहे’, असे मला जाणवले.’ – श्री. धर्मेंद्र सिंह ठाकूर (प्रदेश महासचिव, हिंदु सेवा परिषद), मध्यप्रदेश (४.६.२०२२)
५. ‘हिंदु राष्ट्र-स्थापनेचा संकल्प पूर्ण करण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्थापन केलेल्या या संस्थेने सर्वांचा विश्वास संपादन केला आहे.’
– श्री. शंकर खराल (केंद्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष, विश्व हिंदु महासंघ नेपाळ राष्ट्रीय समिती), पोखरा, नेपाळ (१३.६.२०२२)
‘सनातनच्या आश्रमात काही दिवस राहिल्यावर मला घरी, नातेवाईक किंवा शेजारी यांच्याकडून मिळणार्या प्रेमापेक्षा अधिक प्रेम मिळाले !’ – एक हितचिंतक (जानेवारी २०२२) |
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार धर्मप्रेमींच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |