सनातनचा आश्रम वैदिक हिंदु धर्माचा पाया आहे !
‘आश्रमात सात्त्विकता आणि स्वच्छता आहे. हा आश्रम वैदिक हिंदुधर्माचा पाया आहे. येथे विज्ञान आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम आहे. येथील शिस्त, साधकांचा प्रामाणिकपणा, भक्ती आणि पाहुण्यांप्रती असणारा भाव या गोष्टी वाखाणण्यासारख्या आहेत. सनातन संस्था ही साधना आणि धर्मस्थापना ही दोन उच्च उद्दिष्टे साध्य करण्यासाठी संतुलित दृष्टीकोन असणारी एकमेव हिंदू संस्था आहे. मला या महान आश्रमात यायला मिळाले, हे माझे भाग्य समजते. गुरुजी (परात्पर गुरु डॉ. आठवले) आणि त्यांचे साधक यांच्याप्रती मी कृतज्ञ आहे.’
– डॉ. आय. राजलक्ष्मी, भाग्यनगर (२६.१२.२०१९)