सर्वोच्च न्यायालयाच्या निवडणुकीच्या निर्णयाविषयी राज्य सरकारमध्ये संभ्रम !
सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या कायद्याविषयी भाष्य केलेले नाही. त्यामुळे न्यायालयाचा निर्णय नेमका काय आहे ? याविषयी राज्य सरकारमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या कायद्याविषयी भाष्य केलेले नाही. त्यामुळे न्यायालयाचा निर्णय नेमका काय आहे ? याविषयी राज्य सरकारमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी योग्य ती पावले उचलावीत. यामध्ये कारवाईसाठी कुणाच्याही आदेशाची वाट पाहू नका, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्र्यांना दिली.
सर्वोच्च न्यायालयाने ध्वनीप्रदूषण नियंत्रणासाठी दिलेल्या निकालामध्ये केंद्र सरकारही पक्षकार होते. त्यामुळे केंद्र सरकारनेच भोंगाबंदीचा आदेश काढावा, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले आहे
‘भाजप आणि विरोधक यांच्यावर तुटून पडा’, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी या वेळी दिल्या.
‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे या सम दुसरा होणे नाही’, असे फलक युवा सेनेकडून शहरातील प्रमुख १० चौकांत लावले आहेत.
दोघांमध्ये दीड घंटा चर्चा झाली. ही भेट नेमकी कोणत्या विषयावर झाली, हे अद्याप शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांकडून अधिकृतरित्या सांगण्यात आलेले नाही.
समृद्धी महामार्गावर उभारण्यात येत असलेल्या पुलाचा मोठा भाग २७ एप्रिलच्या रात्री १ ते २ च्या दरम्यान कोसळला. एक मोठा गर्डर ८० फुटांवरून खाली कोसळला. काम चालू असतांना कामगार तेथून बाजूला गेल्यानंतर ही घटना घडली.
धर्मांध अब्दुल सत्तार यांना अटक करावी, तसेच त्यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करण्यात यावी, यासाठी हिंदूंनी वैध मार्गाने आंदोलन करावे !
सद्य:स्थितीत मुंबईत १ लिटर डिझेलच्या दरामध्ये २४.३८ पैसे केंद्राचा, तर २२.३७ पैसे राज्याचा कर वाटा आहे. पेट्रोलच्या दरात ३१.५८ पैसे केंद्रीय कर, तर ३२.५५ पैसे राज्याचा कर आहे. राज्यामुळे पेट्रोल आणि डिझेल महागले आहे, ही वस्तूस्थिती नाही, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
यापुढे मुंबईमध्ये रेल्वे, मेट्रो आणि बेस्ट यांसाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलीटी कार्ड’ या एकाच ‘कार्ड’द्वारे प्रवास करता येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते २५ एप्रिल या दिवशी ‘एक शहर, एक कार्ड’ या योजनेच्या अंतर्गत या ‘कार्ड’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.