स्वतःसमोर ध्येय ठेवणे अधिक चांगले !

स्वामी विवेकानंद यांची शिकवण

ज्याने स्वतःसमोर एखादे ध्येय ठेवले आहे, असा माणूस जर सहस्र चुका करतो, तर काहीच ध्येय नसलेला माणूस ५० सहस्र चुका करील; म्हणून स्वतःसमोर कोणते ना कोणते ध्येय ठेवणे, हे अधिक चांगले आहे.

तुम्ही वस्तूतः कोण आहात ? याचे तुम्हाला ज्ञान असते, तर किती चांगले झाले असते ? तुम्ही आत्मा आहात. तुम्ही ईश्वर आहात. जर मी तुम्हाला माणूस म्हणेन, तर ती तुमची निंदाच होईल.

(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)