देशविरोधी शाहरूख खानचा कोणताही चित्रपट प्रदर्शित करू नये !

देशविरोधी अभिनेता शाहरूख खानच्या ‘पठाण’ चित्रपटासह त्याचा कोणताही चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करू नये, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी तसेच चित्रपट गृहाचे चालक आणि मालक यांना देण्यात आले.

सोलापूर येथे हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेनिमित्त छत्रपती शिवरायांना अभिवादन !

छत्रपती शिवरायांचा आदर्श समोर ठेवून हिंदूंचे संघटन व्‍हावे, या संघटनाद्वारे राष्‍ट्र आणि धर्म यांवरील आघात रोखले जावेत, यासाठी सोलापूर येथे हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्‍यात आले आहे.

‘सम्‍मेद शिखरजी’ या धार्मिक स्‍थळाला ‘तीर्थक्षेत्र’ घोषित करा !

झारखंड राज्‍यातील ‘सम्‍मेद शिखरजी’ या जैन समाजाच्‍या दृष्‍टीने पवित्र असलेल्‍या धर्मस्‍थळाला तीर्थक्षेत्र म्‍हणून घोषित करण्‍यात यावे, या मागणीसाठी सांगोला येथे हिंदु जनजागृती समिती आणि समस्‍त जैन समाज यांच्‍या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्‍यात आले.

अल्‍पवयीन मुलीचे छायाचित्र प्रसारित करण्‍याची धमकी देऊन धर्मांधाची शरीरसंबंधाची मागणी !

महिलांना त्रास देण्‍यामध्‍ये धर्मांध नेहमी पुढे असतात, यातून त्‍यांची वासनांध वृत्ती गेलेली नाही, हेच लक्षात येते. अशा वासनांधांना कठोर शिक्षाच करायला हवी !

बोगस खतनिर्मिती करणार्‍या आस्‍थापनांना कृषी यंत्रणा पाठीशी घालत आहे !

कृषी आयुक्‍तालय येथे २६ जानेवारीला आंदोलन करण्‍याची ‘प्रहार जनशक्‍ती संघटने’ची चेतावणी !

तीर्थक्षेत्रांना पर्यटनाचा दर्जा देण्‍यात आल्‍यास असंतोष निर्माण होईल ! – केतन शहा

‘सम्‍मेद यात्रा पूर्ण केल्‍याविना आमचे जीवन अपूर्ण आहे’, असे आम्‍ही मानतो. सरकारने केवळ ‘सम्‍मेद शिखरजी’च नव्‍हे, तर हिंदूंच्‍या सर्वच पवित्र स्‍थळांना ‘तीर्थक्षेत्र’ म्‍हणून घोषित करायला हवे. हिंदु आणि जैन समाज हे भिन्‍न नाहीत.

हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदु राष्‍ट्र-जागृती सभा

वार : बुधवार, दिनांक : १५ फेब्रुवारी २०२३
वेळ : सायंकाळी ५.३० वाजता

सोलापूरचे वैभव असलेल्‍या सुप्रसिद्ध शिवयोगी श्री सिद्धरामेश्‍वर यात्रेचे स्‍वरूप आणि महत्त्व !

‘काय कवे कैलास’, म्‍हणजे ‘कर्मानेच कैलास प्राप्‍त होतो’, ही थोर शिकवण देणारे अवतारी पुरुष म्‍हणजे श्री सिद्धेश्‍वर महाराज !

श्री शिवयोगी सिद्धरामेश्‍वरांच्‍या यात्रेस तैलाभिषेकाने प्रारंभ !

बाळीवेस येथील हिरेहब्‍बू वाड्यातून पूजाविधी पूर्ण करून ७ मानाचे नंदीध्‍वज ६८ लिंगांना तैलाभिषेक करण्‍यासाठी मार्गस्‍थ झाले होते. या वेळी भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख, आमदार प्रणिती शिंदे, माजी मंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्‍यासह अन्‍य पदाधिकारी उपस्‍थित होते.