सोलापूर येथून २ अल्‍पवयीन मुली बेपत्ता !

मुली बेपत्ता होण्‍याचे प्रमाण वाढले

सोलापूर – सुनीलनगर येथील १ आणि कुर्बान हुसेननगर परिसर येथील १ अशा २ अल्‍पवयीन मुली बेपत्ता झाल्‍या आहेत. १६ जानेवारी या दिवशी दोन्‍ही मुली घरातून गेल्‍यानंतर अद्यापपर्यंत घरी परतल्‍या नाहीत. त्‍यामुळे दोघींनाही फूस लावून पळवून नेल्‍याची तक्रार मुलींच्‍या वडिलांनी पोलिसांत दिली आहे. या प्रकरणी अज्ञातांच्‍या विरोधात अपहरणाचा गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे.

१६ जानेवारी या दिवशी आणखी २ अल्‍पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्‍याची तक्रार प्रविष्‍ट करण्‍यात आली होती. सध्‍या १६ ते १८ वर्षे वयाच्‍या मुली शहरातून बेपत्ता होत असल्‍याचे प्रमाण वाढत असून प्रत्‍येक सप्‍ताहात ४ – ५ मुली बेपत्ता झाल्‍याच्‍या तक्रारी पोलिसांकडे येत आहेत.

संपादकीय भूमिका 

अल्‍पवयीन मुली असुरक्षित असणे, हे सर्वपक्षीय शासनकर्त्‍यांना लज्‍जास्‍पद !