(म्‍हणे) ‘ख्रिस्‍ती धर्मगुरूंना मारहाण, त्‍यांच्‍यावरील धर्मांतराचे खोटे आरोप थांबवा !’

आरोप सिद्ध होण्‍याच्‍या अगोदरच ‘खोटे आरोप’, असे कसे काय म्‍हणता येईल ? धर्मांतर करतांना अनेक ख्रिस्‍ती धर्मगुरूंना पकडले आहे, अनेकांनी धर्मांतर केल्‍याचे मान्‍यही केले आहे.

पंढरपूर येथील माघ वारी अपघातमुक्‍त करण्‍यासाठी प्रयत्न ! – सुनील फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक

माघ वारीसाठी यात्रेच्‍या कालावधीत महामार्गावर पोलिसांचा विशेष पहारा ठेवण्‍यात येणार आहे. यात मुख्‍यत्‍वेकरून कोल्‍हापूर-पंढरपूर महामार्गावर पोलीस साहाय्‍यता केंद्रे चालू करण्‍यात आली असून याद्वारे वारकर्‍यांचे प्रबोधन करण्‍यात येईल.

२५ वर्षे विनाअपघात सेवा देणार्‍या सोलापूर जिल्‍ह्यातील ५६ चालकांचा परिवहन महामंडळाकडून गौरव !

अशा चालकांचा अन्‍य चालकांनी आदर्श घ्‍यावा. असे कर्तव्‍यदक्ष चालकच देशाची शक्‍ती आहे !

‘पठाण’ चित्रपटाचा खेळ रहित करण्‍यासाठी हिंदु राष्‍ट्र सेनेचे भागवत चित्रपटगृहाच्‍या समोर आंदोलन !

येथील भागवत चित्रपटगृह येथे २७ जानेवारी या दिवशी हिंदु राष्‍ट्र सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी ‘पठाण’ चित्रपटाचे पोस्‍टर (भित्तीपत्रक) काढून चित्रपटाचा निषेध केला.

‘स्‍मार्ट सिटी’ योजनेतून सोलापूर महापालिकेच्‍या इंद्रभुवन इमारतीच्‍या सुशोभीकरणाचे काम पूर्ण !

प्रजासत्ताकदिनाच्‍या दिवशी ही इमारत नागरिकांसाठी खुली करण्‍यात आली असून महापालिका आयुक्तांच्या हस्‍ते ध्‍वजारोहण करण्‍यात आले. या वेळी महापालिकेतील पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्‍येने उपस्‍थित होते.

सोलापूर विद्यापिठाच्‍या उत्तरपत्रिकांची ‘ऑनस्‍क्रीन’ पडताळणी होणार !

यंदाच्‍या वर्षी उत्तरपत्रिकांची ‘ऑनस्‍क्रीन’ पडताळणी झाल्‍यास मागील वर्षीचा सांवळा गोंधळ रोखला जाईल, अशी इच्‍छा व्‍यक्‍त केली जात आहे.

हिंदूंनी धर्मासाठी वेळ देण्‍याची आवश्‍यकता ! – अनंत विभूषित महामंडलेश्‍वर स्‍वामी ऋषिराजजी महाराज

स्‍वामी ऋषिराजजी महाराज सांगोला येथील गोवा स्‍टील सेंटरचे मालक भीमारामजी चौधरी यांच्‍या निवासस्‍थानी आशीर्वाद देण्‍यासाठी आले होते.

वसंतपंचमीदिनी श्री विठ्ठल-रुक्मिणी यांचा विवाह सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न !

वसंतपंचमीच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल-रुक्मिणी यांचा विवाह सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडला. राज्याच्या विविध भागांतून आलेले भाविक या सोहळ्यासाठी उपस्थित होते. या सोहळ्यानिमित्त संपूर्ण मंदिर फुलांनी सजवण्यात आले होते.

देशविरोधी शाहरूख खानचा कोणताही चित्रपट प्रदर्शित करू नये !

देशविरोधी अभिनेता शाहरूख खानच्या ‘पठाण’ चित्रपटासह त्याचा कोणताही चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करू नये, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी तसेच चित्रपट गृहाचे चालक आणि मालक यांना देण्यात आले.

सोलापूर येथे हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेनिमित्त छत्रपती शिवरायांना अभिवादन !

छत्रपती शिवरायांचा आदर्श समोर ठेवून हिंदूंचे संघटन व्‍हावे, या संघटनाद्वारे राष्‍ट्र आणि धर्म यांवरील आघात रोखले जावेत, यासाठी सोलापूर येथे हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्‍यात आले आहे.