कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नाशिक येथे वाहनांना मर्यादित इंधन

नागरिकांनी घराबाहेर पडू नये आणि कोरोनाचा संसर्ग वाढू नये, या हेतूंनी येथील जिल्हाधिकार्‍यांनी इंधन पुरवठ्यावर निर्बंध आणले आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्याने खासगी वाहने वापरणार्‍यांची संख्या अधिक आहे.

कोरोनाविषयी केवळ संरक्षक न होता त्याच्या विरोधात आक्रमक नीती वापरा ! – जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रॉस गेब्रयासस

कोरोना इतक्या झपाट्याने पसरतो आहे की, त्याच्या विरोधात संरक्षक नीती न वापरता आपण आक्रमक नीती वापरायला हवी. कोरोनाला हरवता येऊ शकते; पण त्याच्याशी लढण्यासाठी फूटबॉल खेळाच्या सामन्याला जशी नीती वापरतो, तशी रणनीती वापरावी लागेल

सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मुद्रित माध्यमे बंद !

कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षिततेचा एक भाग म्हणून मुद्रित माध्यमांच्या वितरकांनी त्यांचे वितरण बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने गुढीपाडव्यापासून सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मुद्रित माध्यमे बंद करण्यात आली आहेत.

पुणे येथील पहिले कोरोनाबाधित दांपत्य ठीक झाल्याने त्यांना रुग्णालयातून सोडले

कोरोनाचे शहरातील पहिले रुग्ण ठरलेल्या दांपत्याची दुसरी चाचणीही ‘निगेटिव्ह’ आल्याने त्यांना रुग्णालयातून २५ मार्चला ‘डिस्चार्ज’ देण्यात आला. कोरोनाची लागण झाल्याने त्यांना ९ मार्चला नायडू रुग्णालयात भरती करण्यात आले होते.