धर्म शब्दाचा अर्थ
अनिष्टांपासून जगाचे रक्षण करणारे, तसेच मानवाला ऐहिक आणि पारलौकिक उन्नतीसह मोक्ष मिळवून देणारे तत्त्व म्हणजे धर्म !
अनिष्टांपासून जगाचे रक्षण करणारे, तसेच मानवाला ऐहिक आणि पारलौकिक उन्नतीसह मोक्ष मिळवून देणारे तत्त्व म्हणजे धर्म !
‘अज्ञानरूपी धुके नष्ट होऊन आत्मरूपाचा प्रकाश सर्वत्र परिपूर्ण असणे, यालाही मोक्ष म्हणतात.’ – प.प. भगवान श्रीधरस्वामी
‘विज्ञान पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांनी समजून घेतात; म्हणून त्याला मर्यादा आहे. याउलट अध्यात्म पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील असल्याने ते अमर्याद आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
मनुष्याची योग्यता त्याच्या आचरणाने सिद्ध होत असते, नुसती बडबड काही उपयोगाची नाही. दिलदारपणाच त्याला मोठेपणा मिळवून देतो. परहितासाठी झटणाराच खर्या अर्थाने मनुष्य होय.
‘छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मांतराला नकार दिला; म्हणून औरंगजेबाने संभाजीराजांचा अनन्वित छळ केला. त्यांच्या डोळ्यांत तिखट टाकले. एकेक अवयव तोडला. त्यात मीठ भरले, तरीही संभाजीराजांनी हिंदु धर्म सोडला नाही.
‘कुठे एखाद्या विषयाचे काही वर्षे संशोधन करून संख्याशास्त्रावरून (Statistics वरून) निष्कर्ष काढणारे पाश्चात्त्य संशोधक, तर कुठे कुठल्याही प्रकारचे संशोधन न करता मिळणार्या ईश्वरी ज्ञानामुळे कुठल्याही विषयांवरील निष्कर्ष तात्काळ सांगणारे ऋषि !’
‘या नश्वर देहास बाहेरून सजवण्यासाठी निरनिराळे अलंकार घातले, निरनिराळ्या प्रकारची उटणी, साबण यांनी स्वच्छ करून आणि सुवासिक करण्याचा प्रयत्न केला, तरी त्या देहातील आत्म्यास त्याचा काहीही उपयोग नसतो.
‘कुठे पुढील काही वर्षांत काय होणार, याचा अंदाज बुद्धीचा वापर करून सांगणारे पाश्चात्त्य, तर कुठे युगायुगांच्या संदर्भात सांगणारे ज्योतिषशास्त्र !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
आपले मन नियंत्रणात न ठेवता, कह्यात न ठेवता, मानेल तसे भटकण्यास त्याला मोकळीक दिली, तर ते बेलगाम होईल.
‘प्राथमिक शाळेतील मुलाने पदव्युत्तर शिक्षण किंवा डॉक्टरेट झालेल्याशी वाद घालावा, तसे बुद्धीप्रामाण्यवादी अध्यात्मातील अधिकार्यांशी वाद घालतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले