अमित शहा यांच्या पुणे दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर आपच्या कार्यकर्त्यांची धरपकड !

गृहमंत्री अमित शहा यांच्या पिंपरी-चिंचवड मधील दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर ६ ऑगस्ट या दिवशी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून आम आदमी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची धरपकड करण्यात आली.

नारायणगाव (पुणे) येथे प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍या समाधीस्‍थळी त्‍यांच्‍या चरणांवर पवमान अभिषेक !

भवानी पेठ पुणे येथील चैतन्‍य औदुंंबर भजनी मंडळाने भक्‍तीपर भजने सादर केली. या कार्यक्रमाचे आयोजन शिर्डी येथील श्री. अजित देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने झाली.

आतंकवाद्यांनी आयोजित केले होते बाँब बनवण्याचे प्रशिक्षण देणारे शिबिर !

आतंकवादी कारवायांच्या प्रकरणात अटक करण्यात आलेला झुल्फिकार बडोदावाला याने कोथरूडमधून अटक केलेल्या २ आतंकवाद्यांच्या साहाय्याने इतर साथीदारांसाठी बाँब बनवण्याचे प्रशिक्षण देणारे शिबिर आयोजित केले होते.

(म्हणे) ‘औरंगजेबाचे उदात्तीकरण केले तर त्यात वाईट काय ?’ – प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी

भारतभरातील हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्‍या क्रूरकर्मा औरंगजेबाचे उदात्तीकरण करणे, हा राष्ट्रद्रोहच आहे. अशांना भारतात रहायला देणेच चुकीचे आहे.

पू. भिडेगुरुजींची अपकीर्ती करणार्‍यांवर कारवाई करण्याची समर्थकांची पुणे जिल्हाधिकार्‍यांना निवेदनाद्वारे मागणी !

पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्या समर्थनार्थ ५ ऑगस्ट या दिवशी बालगंधर्व चौकामध्ये दुग्धाभिषेक करण्यात येणार होता. त्यासाठी त्यांच्या समर्थकांनी पोलिसांकडे अनुमती मागितली होती; परंतु पोलिसांनी अमित शाह यांच्या दौर्‍याचे कारण देत ही अनुमती नाकारली आहे.

डॉ. प्रदीप कुरूलकरांनी भ्रमणभाषमधील ‘डेटा’ पुसला !

‘डी.आर्.डी.ओ.’चे येथील संचालक आणि वरिष्‍ठ शास्‍त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरूलकर यांनी आपल्‍या भ्रमणभाषमधील ‘डेटा’ पुसला असल्‍याची माहिती अन्‍वेषणातून लक्षात आली आहे.

मेट्रो चालकांमध्ये ७ महिलांची वर्णी !

मेट्रोमध्ये ७ महिला चालक असून या सातही महिलांचे पायलटचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. वनाज ते रुबी हॉल क्लिनिक आणि पिंपरी-चिंचवड ते सिव्हील कोर्ट या अंतरावर मेट्रोची सेवा १ ऑगस्टपासून चालू झाली.

पुणे येथील ‘पाषाण-बाणेर लिंक’ रस्‍त्‍यासाठी सक्‍तीने भूसंपादनाचे मुंबई उच्‍च न्‍यायालयाचे महापालिकेला आदेश !

रहिवाशांना ३० वर्षे त्रास सहन करावा लावणारे संवेदनाशून्‍य महापालिका प्रशासन कधीतरी जनहित साधू शकेल का ? शेवटी न्‍यायालयालाच आदेश द्यावा लागतो, तर प्रशासनाचा एवढा मोठा डोलारा हवा कशाला ?

१५ ऑगस्टला देशात घातपात घडवण्याचा आतंकवाद्यांचा कट महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने उधळला !

राष्ट्रीय सणांच्या वेळी आतंकवादाची टांगती तलवार प्रतीवर्षी भारतियांवर असतेच ! भारत आतंकवादमुक्त करण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक आहे !

ज्‍येष्‍ठ साहित्‍यिक आणि कवी नामदेव धोंडो महानोर यांचे निधन !

‘अजिंठा’, ‘गंगा वाहू दे निर्मळ’, ‘जगाला प्रेम अर्पावे’, ‘दिवेलागणीची वेळ’ हे त्‍यांचे कवितासंग्रह लोकप्रिय ठरले. यासह ‘गपसप’, ‘गावातल्‍या गोष्‍टी’ हे कथासंग्रहही वाचकांना आवडले.