पुणे येथील वंचित बहुजन आघाडीची पत्रकार परिषद !
पुणे – औरंगजेबाचे उदात्तीकरण केले, तर त्यात वाईट काय आहे ? तो इथला राजा होता आणि त्याने तुमच्यावर राज्य केले आहे, असे मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही व्यक्त केले आहे. पुण्यात ४ ऑगस्ट या दिवशी प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी ते बोलत होते. विधीमंडळामध्ये औरंगजेबाचे ‘स्टेटस’ आणि कबरीचे सूत्र गाजले. या सूत्रावरून भाजपचे आमदार नितेश राणे आणि समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्यात खडाजंगी झाली. या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद आयोजित केली होती.
प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, कुणाच्या मजारीवर किंवा कबरीवर जाऊन तुम्ही फुले वाहू शकत नाही, हा कायदा दाखवा, तसेच ‘स्टेटस’ ठेवले म्हणून ज्यांना अटक करण्यात आली आहे, त्यांनी त्या अधिकार्यावर उलटी केस करावी. माझी अपकीर्ती केली आहे, मला नाहक पकडण्यात आले आहे, असे सांगून त्यांनी धाडस दाखवावे. मी कुणाचेही ‘स्टेटस’ ठेवले, तर इतरांना काय त्रास होत आहे ?
संपादकीय भूमिका :
|