स्‍मशानभूमीतील लग्‍न !

आज विदेशातील लोक भारताकडे अध्‍यात्‍मामुळे आकृष्‍ट होऊन हिंदु संस्‍कृतीनुसार आचरण करू लागले आहेत; पण देशातील हिंंदूंनाच महान हिंदु धर्म कळत नाही, हे दुर्दैव आहे. धर्माधिष्‍ठित हिंदु राष्‍ट्रात अशा कुप्रथा नसतील !

‘मोबाईल टॉवर’चे दुष्‍परिणाम !

‘विज्ञानाच्‍या घोड्याला आत्‍मज्ञानाचा (सद़्‍सद्विवेकबुद्धीचा) लगाम घातला पाहिजे; तरच मनुष्‍यजीवनाची वाटचाल सुखकर होईल’, असे मत आचार्य विनोबा भावे यांनी व्‍यक्‍त केले होते, ते किती योग्‍य आहे, याची प्रचीती आज आपल्‍याला येत आहे. यासाठी सर्वांना धर्मशिक्षण देणेही क्रमप्राप्‍त ठरते.

माणसाचा श्‍वान होतो तेव्‍हा…!

‘मानवाचे पूर्वज हे माकड होते’, हे डार्विनच्‍या उत्‍क्रांतीवादाचे गृहीतक फसलेले आहे; मात्र ते उलट होऊन, सध्‍याचा मानव माकडाप्रमाणे वर्तन करून मानवाचा माकडच होतो कि काय ? अशीच परिस्‍थिती निर्माण झाली आहे. हे रोखण्‍यासाठी मानवाला धर्मशिक्षण देणेच आवश्‍यक आहे !

कल्‍पनाविश्‍व नको, वास्‍तव जाणा !

सध्‍या लहान मुलांचे वाढदिवस त्‍यांचे पालक अगदी थाटामाटात साजरे करतात. अनेकदा त्‍यानिमित्त एखादी सजावटीची संकल्‍पना ठरवली जाते. त्‍या संकल्‍पनेच्‍या अनुषंगाने एखादा देखावा उभारला जातो. त्‍या देखाव्‍यासमोर उभे राहून वाढदिवस साजरा करतांनाची छायाचित्रे काढली जातात. अशा एका वाढदिवसाचे छायाचित्र पहाण्‍यात आले. त्‍यात ‘स्‍पायडरमॅन’ची संकल्‍पना सादर करण्‍यात आली होती. देखावा म्‍हणून मागील बाजूला कोळ्‍याच्‍या मोठ्या जाळ्‍याचे चित्र … Read more

श्री गणेशमूर्तीचे विडंबन नकोच !

सप्‍टेंबरमध्‍ये गणेशोत्‍सव चालू होणार…! त्‍याची लगबग काही मास आधीच चालू होते. ठिकठिकाणी सिद्ध केल्‍या जाणार्‍या श्री गणेशमूर्ती गणेशभक्‍त आपापल्‍या घरी किंवा जेथे गणेशोत्‍सव साजरा केला जातो, त्‍या ठिकाणी घेऊन जातात.

सहकार्यातून व्‍यावसायिक प्रगतीकडे !

‘शिक्षण ते नोकरी-व्‍यवसाय’, असा साधारणपणे व्‍यावसायिक वाटचालीचा क्रम असतो. कुणी अभ्‍यासात हुशार असतो, तर कुणी जेमतेम असतो, तर काही जण ‘ढ’ असतात.

‘पाणीपत्नी’ समस्‍या संपणार कधी ?

देशाला स्‍वातंत्र्य मिळून ७५ वर्षे होऊनही देशात महिलांविषयी अशी स्‍थिती असणे, हे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना लज्‍जास्‍पद नाही का ? ‘देशाच्‍या प्रगतीसाठी मुलींना वाचवा, मुलगी शिकली आणि घराची प्रगती झाली’ असे शासनाचे विज्ञापन आहे; परंतु देशातील वरील स्‍थिती पाहिल्‍यास मन खिन्‍न होते !

पुनर्वसन कागदावरच ?

भूस्‍खलन आणि डोंगर खचण्‍याच्‍या घटना आताही घडत आहेत. या निमित्ताने प्रशासनाने पूर्वीच्‍या बाधित झालेल्‍या कुटुंबांचे पुनर्वसन झाले आहे ना ? याचा आढावा घ्‍यावा. यासाठी कालबद्ध कृतीशील कार्यक्रम आखावा, अन्‍यथा नेहमीप्रमाणे घोषणा केवळ कागदावरच, असे म्‍हणावे लागू नये !

शासनाचा भ्रष्‍ट कारभार !

शासन समाजहिताच्‍या दृष्‍टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेते. अन्‍न, वस्‍त्र आणि निवारा या मूलभूत सुविधांसमवेत उत्तम शिक्षण आणि आरोग्‍य यांचा समावेश यामध्‍ये झालेला आहे, हे अभिनंदनीय आहेे.

स्‍त्रीशक्‍ती !

चंद्रयानाच्‍या यशस्‍वी प्रक्षेपणानंतर सामाजिक माध्‍यमांवर साडी नेसलेल्‍या, डोक्‍यात गजरा माळलेल्‍या आणि कपाळावर टिकली लावलेल्‍या ‘इस्रो’च्‍या महिला शास्‍त्रज्ञांचे आनंद व्‍यक्‍त करतांनाचे छायाचित्र प्रसारित झाले.