नामांतराला विरोध का ?

नामांतराला विरोध का ?

सहस्रो हिंदूंची हत्या करणार्‍या औरंगजेबाच्या नावाचा आग्रह करणार्‍यांनी विकासाच्या गोंडस नावाखाली नामांतराला विरोध करून स्वत:चा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करू नये. याउलट नामांतराने हिंदूंमध्ये होणारे मानसिक परिवर्तन हाच खरा विकास असून त्याआधारे हिंदु धर्म आणि हिंदु संस्कृती यांची पताका उंचावत जाणार आहे.

प्रसारमाध्यमांनो, आदर्श व्हा !

प्रसारमाध्यमांनो, आदर्श व्हा !

समाज परिवर्तनासाठी सत्ता आणि राजकारण असते. त्यामुळे प्रसिद्धीमाध्यमांनी समाजाला केंद्रस्थानी ठेवून काम केले पाहिजे. आठवड्यातील ७ दिवस आणि दिवसातील २४ घंटे राजकीय बातम्या दाखवणे, त्यांची अवास्तव प्रसिद्धी करणे, त्यांचे दर्जाहीन समालोचन करणे, असभ्य भाषेत बोलणे या गोष्टी थांबल्याच पाहिजेत !

मराठी माध्यमाच्या शाळा हव्यात !

मराठी माध्यमाच्या शाळा हव्यात !

तराजूत तोलल्यास इंग्रजी आणि मराठी यांमध्ये मराठीचे पारडे जड व्हायला हवे. मराठीला पुनर्वैभव मिळवून देणे मराठीजनांच्याच हातात आहे. बालकरूपी मातीच्या गोळ्याला मराठमोळे घडवा, त्याला इंग्रजाळलेले करू नका. त्यातच त्याचे उज्ज्वल भविष्य सामावलेले आहे !

पांडुरंगाला शरण जा !

पांडुरंगाला शरण जा !

ज्याप्रमाणे भक्त ‘पंढरपूरमध्ये पांडुरंग आहे’, हे अनुभवतात, तसेच प्रशासन पांडुरंगाला शरण गेल्यास त्यांनाही त्याचे अस्तित्व अनुभवता येईल. प्रत्यक्ष पांडुरंगाला शरण जाऊन नियोजन केल्यास तो ‘कुठे काय करायला हवे’, हे कुणाच्या ना कुणाच्या माध्यमातून सुचवेल आणि सर्व व्यवस्थित होईल, हे नक्की !

प्लास्टिकला हद्दपार करूया !

प्लास्टिकला हद्दपार करूया !

‘प्रशासनाने नियम किंवा दंड लावल्यावरच मी सुधारीन’, ही मानसिकता आता पालटायला हवी. प्रत्येकाने स्वतःचे दायित्व समजून प्लास्टिकचा वापर बंद करायला हवा. आपण प्रशासनाला नियम करायला जागाच ठेवली नाही, तर खऱ्या अर्थाने सुशासन म्हणजेच रामराज्य येईल !

विवाह जुळवण्यातून फसवणूक !

कालांतराने विवाह जुळवणे, हा पैसा कमावणे, व्यावसायिक, तसेच विज्ञापनाचा भाग बनला. त्यातून वधू-वर सूचक केंद्र, संकेतस्थळ, वर्तमानपत्रांतील विज्ञापन, वधू-वर मेळावे, विवाह जमवणारे दलाल अस्तित्वात आले. यामध्ये काहींचा हेतू वधू अथवा वर यांची, तसेच त्यांच्या नातेवाइकांची फसवणूक करून पळ काढणे असा झाला आहे.

मनोवृत्तीत पालट आवश्यक !

मनोवृत्तीत पालट आवश्यक !

‘सीसीटीव्ही’ बसवल्याने लाच मागण्याचे प्रमाण न्यून होणार नसून मनुष्याच्या मूळ मनोवृत्तीत पालट होणे अत्यंत महत्त्वाचे ! मनोवृत्ती पालटण्यासाठी संस्कार आवश्यक आहेत. योग्य संस्कार रुजवण्यासाठी धर्मशिक्षण आवश्यक आहे. प्रशासनाने याकडे लक्ष दिल्यास सीसीटीव्ही सारख्या बाह्य गोष्टींची आवश्यकता भासणार नाही !

खासगी सावकारीला चाप कधी ?

खासगी सावकारीला चाप कधी ?

खासगी सावकारीचे चक्र मोडून काढण्यासाठी पोलीस प्रशासनाने प्रबळ इच्छाशक्ती दाखवून सावकारी टोळ्यांना कठोर शिक्षा कशी होईल, याठीच प्रयत्न करणे आवश्यक आहे. असे झाले, तरच खासगी सावकारीला आळा घालणे शक्य होईल !

वृक्षांची महानता !

वृक्षांची महानता !

२६० वर्षांपूर्वी सिद्ध केलेली घोडागाडी आजही रस्त्यावर उतरते, यावरून ती सिद्ध करण्यासाठी वापरलेल्या वृक्षांची महानता लक्षात येते. त्यामुळे अशा चिरकाल टिकाऊ वस्तू सिद्ध होणाऱ्या वृक्षांचे जतन आणि संवर्धन करणे, ही काळाची आवश्यकता आहे. पुढील आपत्काळात तेच आपल्याला उपयोगी ठरतील.

कायद्याची प्रभावी कार्यवाही ?

कायद्याची प्रभावी कार्यवाही ?

स्त्रीला मुलगा किंवा मुलगी होणे, हे प्रारब्धानुसार ठरत असल्याने गर्भलिंगनिदान हे प्रारब्धापासून काढलेली पळवाट आहे. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाला धर्मशिक्षण मिळाल्यास अशा घटनांवर निर्बंध आणणे सहज शक्य होईल !