लोकमान्य टिळक यांचे स्वातंत्र्यलढ्यातील समर्पण हे देशवासियांना नेहेमीच प्रेरणा देत राहील ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट’च्या वतीने लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन १ ऑगस्ट या दिवशी सन्मानित करण्यात आले. त्याआधी पंतप्रधान मोदी यांनी लोकमान्य टिळकांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले.

सिंधुदुर्ग : ‘ऑनलाईन’ अर्जातील चुकांमुळे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभापासून अनेक लाभार्थी वंचित ! 

शासकीय यंत्रणेच्या चुकांमुळे अनेक लाभार्थी या योजनेपासून वंचित रहाणार आहेत. त्यामुळे अशा लाभार्थ्यांची ‘ऑनलाईन पोर्टल’वरील माहिती वेळीच अद्ययावत करावी, अन्यथा ते लाभार्थी कायमस्वरूपी अपात्र ठरले जाऊ शकतात.

पंतप्रधान मोदी यांच्‍या पुणे दौर्‍याला युवक काँग्रेसचा विरोध !

पंतप्रधान मोदी यांच्‍या दौर्‍याचा विरोधकांनी अनेक माध्‍यमांतून निषेध व्‍यक्‍त केला आहे. युवक काँग्रेसच्‍या वतीने पुण्‍यातील परिसरामध्‍ये पोस्‍टर्स (फलक) लावण्‍यात आली आहेत.

दगडूशेठ बाप्पाचे दर्शन ते मेट्रोचे लोकार्पण, असा होईल पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा !

पंतप्रधान सकाळी ११ वाजता दगडूशेठ गणपति मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत. तिथे पूजा-अर्चा केल्यानंतर सकाळी ११.४५ वाजता त्यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

यावर्षी भारतातील ४ सहस्र महिलांनी पुरुषांविना हज यात्रा केली ! – पंतप्रधान मोदी

यंदाच्‍या वर्षी प्रथमच देशातून ५० किंवा १०० नव्‍हे, तर ४ सहस्र मुसलमान महिला एकट्याच, म्‍हणजे पुरुषांविना हज यात्रा करून आल्‍या, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या मासिक कार्यक्रमात दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या दौर्‍यासाठी ५ सहस्र पोलिसांचा बंदोबस्‍त !

पंतप्रधान नरेंद्र मोदी १ ऑगस्‍ट या दिवशी पुण्‍यात येणार असल्‍याने शहरात कडक बंदोबस्‍त ठेवला आहे. पंतप्रधानांच्‍या सुरक्षेचे दायित्‍व असलेले विशेष सुरक्षा पथक (एस्.पी.जी), ‘फोर्स वन’चे सैनिक अशा एकूण ५ सहस्र पोलिसांचा बंदोबस्‍त आहे.

१५ जानेवारी २०२४ या दिवशी अयोध्येतील श्रीराममंदिरात मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्याला प्रारंभ होणार !

या महोत्सवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण पाठवण्यात आले आहे, अशी माहिती मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी दिली.

नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण प्रत्येक भारतीय भाषेला योग्य आदर आणि महत्त्व देणार ! – पंतप्रधान मोदी 

नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण प्रत्येक भारतीय भाषेला योग्य आदर आणि महत्त्व देणार असून जे लोक स्वार्थासाठी भाषेच्या नावाखाली राजकारण करत आहेत, त्यांना त्यांचे दुकान बंद करावे लागेल, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

पंतप्रधान मोदींकडून काँग्रेसच्‍या विरोधात ‘क्‍विट इंडिया’ची घोषणा !

राजस्‍थानमध्‍ये येऊ घातलेल्‍या विधानसभा निवडणुकीच्‍या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील शेखावटी भागात निवडणूक प्रचारास आरंभ केला.

भारतासमवेतचे भक्कम संबंध श्रीलंकेच्या विकासासाठी महत्त्वाचे ! – श्रीलंका

भारतासमवेत भक्कम नाते निर्माण करतांना चीनला दूर ठेवणे आणि श्रीलंकेतील तमिळ हिंदूंचे रक्षण करणे महत्त्वाचे आहे. श्रीलंकेने त्याविषयी भारताला आश्‍वस्त करून कृती करावी !