राज्‍यात एका दिवसात कोरोनाबाधित रुग्‍णांच्‍या संख्‍येत दुपटीने वाढ !

महाराष्‍ट्रात २७ मार्च या दिवशी कोरोनाबाधित नवीन २०५ रुग्‍ण आढळले; मात्र २८ मार्च या दिवशी ४५० नवीन रुग्‍ण आढळले. म्‍हणजे एकाच दिवशी कोरोनाबाधित रुग्‍णांच्‍या संख्‍येत दुपटीहून अधिक वाढ झाली आहे.

पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांचे बनावट टि्‌वटर खाते बनवून भामट्याने पैसे उकळले !

महाराष्‍ट्रातील ‘लेडी सिंघम’ म्‍हणून ओळखल्‍या जाणार्‍या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्‍या नावाने टि्‌वटरवर बनावट खाते उघडल्‍याचा प्रकार समोर आला आहे. या बनावट खात्‍यावरून सायबर भामट्याने एका मुलीचे ‘लिव्‍हर ट्रान्‍सप्‍लांट’ केले असून उपचारासाठी पैशांची नितांत आवश्‍यकता असल्‍याची ‘पोस्‍ट’ टाकली.

अधिवक्‍ते गुणरत्न सदावर्ते यांची सनद २ वर्षांसाठी रहित

राज्‍य परिवहन मंडळाच्‍या कर्मचार्‍यांच्‍या आंदोलनात आणि बैठकीत अधिवक्‍त्‍यांचा काळा कोट अन् बँड घालून गेल्‍या प्रकरणी अधिवक्‍ते गुणरत्न सदावर्ते यांच्‍यावर महाराष्ट्र-गोवा बार कौन्‍सिलने शिस्‍तभंगाची कारवाई करून यांची सनद २ वर्षांसाठी रहित केली आहे.

महाराष्‍ट्र राज्‍य मानवाधिकार आयोगातील ५० टक्‍के पदे रिक्‍त !

ही रिक्‍त पदे तातडीने भरून न्‍यायदानाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होणे अपेक्षित !

शासकीय कार्यालयांमध्‍ये नागरिकांसाठी वेळ निश्‍चित होणार, मंत्रालयापासून ग्रामपंचायतीपर्यंत आदेश लागू !

आठवडा, पंधरवडा किंवा मासातून ठराविक वेळ निश्‍चित करावा. शक्‍यतो दुपारी २.३० ते ३.३० ही समान वेळ असावी. या वेळेत शक्‍यतो दौर्‍यांचे नियोजन करण्‍यात येऊ नये, असे आदेशत म्‍हटले आहे.

सीरियातील तरुणीकडून नवी मुंबईतील एकाची फसवणूक !

त्‍या तरुणीने कधी कस्‍टम ड्युटी, कधी आयकर विभाग भरणा, तर कधी कस्‍टम सर्विस चार्जेस अशा प्रकारे पैशांची मागणी केली होती. सामाजिक संकेतस्‍थळांचा वापर करतांना सतर्कता बाळगा !

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पथकर दरात १८ टक्‍क्‍यांची वाढ !

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पथकर दरात १८ टक्‍क्‍यांची वाढ करण्‍यात आली आहे. त्‍यामुळे १ एप्रिल २०२३ पासून या मार्गावरून प्रवास करणार्‍यांना पथकरासाठी १८ टक्‍के अधिक रक्‍कम मोजावी लागेल.

१ एप्रिलपासून मंत्रालयीन कामकाजाचा वेग वाढणार !

मंत्रालय आणि शासकीय क्षेत्रीय कार्यालये येथील  कामकाज गतीने व्‍हावे, यासाठी उन्‍नत संगणकीय कार्यप्रणाली चालू करण्‍याचा निर्णय राज्‍यशासनाने घेतला आहे.

सातारा येथे प्‍लास्‍टर ऑफ पॅरिसच्‍या मूर्तींची विक्री करण्‍यास प्रतिबंध !

धार्मिक उत्‍सव साजरे करतांना नैसर्गिक जलस्रोतांच्‍या गुणवत्तेवर आणि पर्यावरणावर कोणताही परिणाम न होता पर्यावरणपूरक मूर्तीचे विसर्जन सुनिश्‍चित करण्‍यासाठी नियम सिद्ध करण्‍यात आले आहेत.

अनिक्षा जयसिंघानीला जामीन संमत

अनिक्षाला अमृता फडणवीस यांना लाच देण्‍याचा प्रयत्न करणे, धमकावणे या आरोपांवरून अटक करण्‍यात आली होती.