दुमजली बंगला खचून वृद्ध आईसह मुलाचा मृत्‍यू !

विद्याविहार पूर्वेला असलेल्‍या चित्तरंजन कॉलनीत २५ जून या दिवशी दुमजली बंगला ८ ते १० फूट खाली खचला होता. रात्री विलंबाने हा बंगला पूर्णपणे पाडून आतमध्‍ये अडकलेले नरेश पलांडे (वय ५६ वर्षे) आणि त्‍यांची आई अलका पलांडे (वय ९४ वर्षे) यांना २० घंट्यांनंतर बाहेर काढण्‍यात आले..

अधिवक्‍ता गुणरत्न सदावर्ते यांच्‍या पॅनलने १९ जागा जिंकल्‍या !

महाविकास आघाडी सरकारच्‍या काळात प्रदीर्घ काळ चालू असलेल्‍या एस्.टी. कर्मचार्‍यांच्‍या आंदोलनाचे नेतृत्‍व करणारे अधिवक्‍ता गुणरत्न सदावर्ते यांच्‍या पॅनलने स्‍टेट ट्रान्‍सपोर्ट को-ऑप बँकेच्‍या निवडणुकीत बाजी मारली आहे. बँकेतील संचालकपदाच्‍या १९ जागांसाठी ही निवडणूक झाली होती.

राजे शिवाजी उत्‍सव मंडळाच्‍या वतीने विनामूल्‍य शैक्षणिक साहित्‍याचे वाटप !

ए.पी.एम्.सी. फळ मार्केट येथील राजे शिवाजी उत्‍सव मंडळाच्‍या वतीने प्रतीवर्षीप्रमाणे याही वर्षी शालेय विद्यार्थ्‍यांना विनामूल्‍य शैक्षणिक साहित्‍याचे वाटप करण्‍यात आले. या वेळी शिवसेनेचे फळ मार्केटचे उपविभाग प्रमुख तथा मंडळाचे संस्‍थापक अध्‍यक्ष गणेश म्‍हांगरे, बाबासाहेब नवले, संकेत तांबोळी आदी पदाधिकारी उपस्‍थित होते.

तुर्भे येथे पहिल्‍या पावसातच ९ घंटे विद्युत् पुरवठा खंडित !

तुर्भे येथे पहिल्‍या पावसातच महावितरणच्‍या पावसाळीपूर्व कामांची पोलखोल झाली. २४ जूनला संध्‍याकाळी पाऊस चालू होताच तुर्भे परिसरातील विद्युत् पुरवठा खंडित झाला. तो रविवारी पहाटे पूर्ववत् झाला. ९ घंटे वीज नसल्‍याने रहिवाशांना अंधारात रात्र काढावी लागली.  

विद्याविहार येथे दुमजली बंगला ८ ते १० फूट खचला !

अग्‍निशमन दल, एन्‌डीआरएफ, पोलीस आणि पालिका अधिकारी यांनी दोघांना बाहेर काढले; मात्र दोघेजण आतच अडकून होते.

नवीन पनवेल येथील घरांवर आढळली आतंकवाद्यांचे समर्थन करणारी भित्तीपत्रके !

औरंगजेबानंतर आता आतंकवाद्यांचे समर्थन ही महाराष्ट्रासह देशासाठीही धोक्याची घंटा आहे. या धर्मांधांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत !

आषाढी एकादशीला पंढरपूर मंदिरात लोकप्रतिनिधींसाठीचे ‘व्ही.आय्.पी.’ दर्शन बंद !

‘अतीमहनीय असणे’ हा देवाच्या दर्शनासाठीचा निकष नको, तर ‘भक्त असणे’, हा निकष हवा !

महात्मा फुले आरोग्य योजनेंतर्गत १ सहस्र ९०० रोगांवर उपचार होणार !

केंद्र आणि राज्य शासनाची योजना एकत्रित केल्याने केंद्रशासनाचा मोठा निधी राज्याला मिळेल आणि राज्य सरकारचा आर्थिकभारही न्यून होईल.

माहीममध्‍ये अज्ञातांनी औरंगजेबासह प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र असलेले फलक लावले !

माहीम परिसरात अज्ञातांनी उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर आणि औरंगजेब यांचे वादग्रस्‍त मजकुरासह एकत्रित छायाचित्र असलेले फलक मध्‍यरात्री लावले होते. सकाळी स्‍थानिक शिवसैनिकांनी तात्‍काळ हे फलक हटवले.

मुंबई आणि पुणे येथे बाँबस्‍फोट करण्‍याची धमकी, एकाला अटक !

मुंबई आणि पुणे येथे बाँबस्‍फोट करण्‍याची धमकी देणार्‍याला मुंबई पोलिसांनी उत्तरप्रदेश येथून अटक केली आहे. यासाठी मुंबई पोलिसांनी उत्तरप्रदेश पोलिसांचे साहाय्‍य घेतले.