६ अजगरांसह २ घोरपडी, एक पाल आणि एक सरडा यांची चोरी !

मुंबईमध्ये शिवाजी पार्क येथील प्राणीसंग्रहालयातील प्रकार !

मुंबई – शिवाजी पार्क येथील मरीन ॲक्वा प्राणीसंग्रहालयातून ६ अजगरांसह २ घोरपडी, एक पाल आणि एक सरडा यांची चोरी झाली आहे. हे सर्व प्राणी परदेशी प्रजातीचे आहेत. प्राणीसंग्रहालयातील कथित अनधिकृत बांधकामावर मुंबई महानगरपालिकेने नुकतीच कारवाई केली होती. या कारवाईमागे राजकीय सूडबुद्धी असल्याचा आरोप प्राणी संग्रहालय प्रशासनाने आरोप केलाय. प्राणी संग्रहालयाच्या विश्वस्तांच्या तक्रारीनंतर चोरीप्रकरणी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. चोरी झालेल्या प्राण्यांची किंमत साडेचार लाख रुपये इतकी आहे.