रशिया-युक्रेन युद्ध अनेक वर्षे चालू राहू शकते ! – नाटो

पश्चिमी देशांना युक्रेनला दीर्घकाळ साहाय्य करत रहाण्याची सिद्धता ठेवावी लागेल. रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध काही वर्षे चालू राहू शकते.

नेपाळच्या पंतप्रधानांकडून भारतातील ३ गावांवर पुन्हा दावा

लिपुलेख, लिम्पियाधुरा आणि कालापानी ही तीनही गावे नेपाळचे भाग आहेत, असा खोटा दावा नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देऊबा यांनी केला.

रशिया-युक्रेन युद्धात झालेली नागरिकांची दुःस्थिती !

सरकारकडून देण्यात येणाऱ्या पाव किंवा धान्य यांसारख्या खाण्याच्या वस्तू मिळवण्यासाठी नागरिक हाणामारी करत असल्याचे दृष्य युक्रेनमध्ये दिसले.

…तिसरे महायुद्ध चालू होण्याची शक्यता ! – डॉ. शैलेंद्र देवळणकर, परराष्ट्र व्यवहार तज्ञ

तिसरे महायुद्ध चालू झाल्यास त्याला रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन हेच उत्तरदायी असतील !

युक्रेनने प्रथमच रशियावर क्षेपणास्त्र डागले

गेले ३५ दिवस चालू असलेल्या रशिया आणि युक्रेन युद्धामध्ये युक्रेनने बचावात्मक पवित्रा सोडून प्रथमच रशियाच्या एका गावातील सैन्यतळावर क्षेपणास्त्राद्वारे आक्रमण केले.

नाराज रशियन सैनिकांनी स्वतःच्याच कर्नलला रणगाड्याखाली चिरडून मारले ! – पाश्चात्त्य देशांतील अधिकार्‍यांचा दावा

गेल्या मासाभरापासून रशियाच्या युक्रेनविरोधातील सैनिकी कारवाया चालू असूनही त्याला युक्रेनवर नियंत्रण मिळवता आलेले नाही. एकूण परिस्थिती पहाता रशियन सैनिकांचे मनोधैर्य खचू लागले आहे, असे म्हटले जात आहे.

चीनने प्रथम सीमेवरून सैन्य हटवावे, तरच द्विपक्षीय संबंध सामान्य होतील !

वर्ष २०२० च्या गलवान खोर्‍यात झालेल्या संघर्षानंतर दोन्ही देशांतील सर्वोच्च स्तरावरील ही पहिलीच चर्चा आहे. प्रत्येक वेळी भारताने पूर्व लडाखमध्ये चीनने सैन्य पूर्णपणे मागे घेण्याचे आवाहन केले आहे.

आम्ही नाही, तर ‘नाटो’ आणि युक्रेन यांनी अणूयुद्धाची गोष्ट केली ! – रशियाची कोलांटीउडी

‘जोपर्यंत युद्धाचा आमचा उद्देश पूर्ण होत नाही, तोपर्यंत युद्ध चालूच राहील’, अस सांगतांनाच लावरोेव्ह यांनी ‘युक्रेनशी कोणत्याही अटीविना चर्चा करण्यास रशिया सिद्ध आहे’, असेही म्हटले आहे.

युक्रेनच्या युद्धात रशियाने वापरलेला धोकादायक ‘व्हॅक्युम बाँब’ !

रशियाने जर युक्रेनमध्ये ‘व्हॅक्युम बाँब’ वापरला असेल, तर ते अतिशय चुकीचे आहे; कारण आंतरराष्ट्रीय कायदा एवढा मोठा विध्वंसक बाँब वापरण्याची अनुमती देत नाही. त्यामुळे रशियाची ही कृती आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरुद्ध आहे.

युक्रेनवरील आक्रमण थांबवा !

रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्धविरामावर अर्थपूर्ण चर्चा चालू होण्यासाठी अशी विनंती युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी रशियाला केली आहे.