प्रेमळ आणि तळमळीने अन् परिपूर्ण सेवा करणारे पुणे येथील ६९ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. अरविंद सहस्रबुद्धे (वय ७५ वर्षे) !
मागील १५ वर्षांपासून ते साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या संदर्भातील सेवा अखंड करत आहेत. आतापर्यंत कोणालाही त्यांच्या सेवेचा पाठपुरावा घ्यावा लागला नाही. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी मला ही सेवा दिली आहे. मला ती वेळेत आणि अचूक करायला हवी’, असा त्यांचा भाव असतो.