कोलकाता (बंगाल) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. ऐन्द्री देबनाथ (वय ७ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. ऐन्द्री देबनाथ ही या पिढीतील एक आहे !

नम्र आणि गुरुसेवा तळमळीने करणार्‍या फोंडा, गोवा येथील सौ. विद्या शानभाग (वय ४१ वर्षे) !

तिने घरी स्वच्छतेची सेवा केल्यावर ती विश्रांतीसाठी न थांबता आश्रमात जाऊन सेवा करते. ती म्हणते, ‘‘मी आश्रमात जाऊन सेवा केली नाही, तर माझ्या मनाला समाधान मिळणार नाही.’’

प्रतिकूल परिस्थितीतही तळमळीने साधना करणारे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले लिबिया (उत्तर आफ्रिका) येथील श्री. बबन अडणेकर !  

श्री. बबनदादांना साधनेविषयी काही सूत्रे सांगितल्यास त्यानुसार ते तत्परतेने कृती करतात.

साधिकेला सहसाधकांकडून शिकायला मिळालेली सूत्रे

‘सेवा दोषरहित, गुणांची सांगड घालून आणि भावपूर्ण केल्याने वैयक्तिक स्तरावर तर लाभ होणारच; पण समष्टीलाही त्याचा लाभ होणार असल्याचे पुढील काही साधक आणि प्रसंग यांतून मला शिकायला मिळाले.

५१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला बेंगळुरू येथील चि. अर्जुन विनय बिरारी (वय ५ वर्षे)

चि. अर्जुन विनय बिरारी याचा २५.८.२०२४ (श्रावण कृष्ण सप्तमी) या दिवशी तिथीने वाढदिवस आहे. त्याच्या आजीला त्याच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

ठाणे येथील ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. आरव अनिकेत मेढेकर (वय १० वर्षे) !

उच्च स्वर्गलोकातून जन्माला आलेला कु. आरव अनिकेत मेढेकर याचा २४.८.२०२४ (श्रावण कृष्ण षष्ठी) या दिवशी दहावा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या वडिलांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

करंजाडे, नवीन पनवेल (जिल्हा रायगड) येथील ५३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला कु. ऋग्वेद राजेश गावडे (वय ७ वर्षे) !

उच्च स्वर्गलोकातून जन्माला आलेला कु. ऋग्वेद राजेश गावडे याचा २४.८.२०२४ (श्रावण कृष्ण षष्ठी) या दिवशी सातवा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

अनेक सेवा कौशल्याने करणारे मथुरा येथील हिंदु जनजागृती समितीचे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. श्रीराम लुकतुके !

श्री. श्रीराम लुकतुके (वय ४३ वर्षे) हे एक अष्टपैलू व्यक्तीमत्त्व आहे. मला त्यांच्या समवेत सेवा करतांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सेवाभावी वृत्तीने आणि तळमळीने परिपूर्ण सेवा करणार्‍या केरळ येथील साधिका श्रीमती विजया कुमारी (वय ६१ वर्षे) !

श्रीमती विजया कुमारी या घरोघरी प्रसार करणे, ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार बनवणे, मंदिरांत धर्मशिक्षण फलक लिहिणे, ग्रंथप्रदर्शन लावणे, तसेच हिंदीमधून मल्याळम् भाषेत भाषांतर करणे या सर्व सेवा करतात. कुठलीही सेवा करण्यास त्या तत्परतेने सिद्ध असतात. त्यांची सेवेची गती तरुणांना लाजवेल, अशी आहे…

प्रेमभाव असणार्‍या बेळगाव येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या (कै.) सौ. अर्चना लिमये (वय ६५ वर्षे) !

‘लिमयेकाकू स्वत:साठी साहित्य विकत घेतांना आठवणीने भ्रमणभाष करून ‘बेळगाव सेवाकेंद्रासाठी काही हवे का ?’, असे विचारत असत. काकू सेवाकेंद्रातील साधकांसाठी काही वेळा जेवणाचा डबा पाठवत असत.