ही वसुली कधी होणार ?

११ ऑगस्ट २०१२ या दिवशी मुंबईतील आझाद मैदानात घडवलेल्या दंगलीच्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने रझा अकादमीकडून ३६ लाख रुपयांची वसुली करण्याचा आदेश दिला; पण ११ वर्षांनंतरही ही वसुली झालेली नाही.

हिंदूंना धर्मशिक्षण द्या !

‘जोपर्यंत भारतातील प्रत्येक मंदिर हिंदूंना हे शिकवणार नाही की, सनातन म्हणजे काय ? हिंदु म्हणजे काय ? तोपर्यंत धर्मांतराच्या घटना घडत रहातील’, असे विधान बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी केले.

बंगालमधील हुकूमशाही जाणा !

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही बंगालमध्ये ‘द केरल स्टोरी’ चित्रपटावर अवैधरित्या बंदी घालण्यात आली आहे. चित्रपटगृहांच्या मालकांना पोलीस आणि प्रशासन यांच्याकडून धमक्या येत आहेत, असा आरोप चित्रपटाचे निर्माते विपुल शहा यांनी केला.

बांगलादेशातील हिंदू असुरक्षित !

धर्मांध मुसलमानांनी १७ मेच्या रात्री बांगलादेशच्या नौगाव जिल्ह्यातील महादेवपूर उपजिल्ह्यात असलेल्या नोहाटा मोर, सरकार पारा येथील काली मंदिराला आग लावली

अशा धर्मांधांवर कठोर कारवाई करा !

चिखली (बुलढाणा) येथे एका विवाहाच्‍या वरातीत डी.जे.वर भगवान श्रीरामाचे लावलेले गाणे धर्मांधांनी थांबवण्‍यास सांगत वरातीवर दगडफेक केली.

हिंदुद्वेषी तृणमूल काँग्रेसवर कारवाई करा !

बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारने कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर घातलेली बंदी सर्वाेच्च न्यायालयाने सरकारला फटकारत हटवण्याचा आदेश दिला.

राजस्‍थानच्‍या काँग्रेस सरकारची पाकिस्‍तानी राजवट जाणा !

जैसलमेर (राजस्‍थान) येथील अमर सागर भागात पाकिस्‍तानी निर्वासित हिंदु  कुटुंबांची ५० घरे प्रशासनाने बुलडोझरद्वारे पाडली. हे पाकिस्‍तानी निर्वासित हिंदू बर्‍याच काळापासून येथे रहात होते.

हिंदुद्वेषी द्रमुक सरकारचा खाेटारडेपणा जाणा !

आम्ही राज्यात चित्रपटावर बंदी आणलेली नाही. चित्रपटगृहाच्या मालकांनीच प्रेक्षकांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याने चित्रपट हटवला आहे, असे प्रतिज्ञापत्र तमिळनाडूतील द्रमुक सरकारने ‘द केरल स्टोरी’विषयी सर्वाेच्च न्यायालयात सादर केले.

कर्नाटकमधील काँग्रेसच्या विजयाचा दुष्परिणाम जाणा !

कर्नाटकमध्ये मुसलमानांनी काँग्रेसला मतदान केल्याने तिचा विजय झाला आहे. त्यामुळे काँग्रेसने या बदल्यात मुसलमानाला उपमुख्यमंत्री करावे आणि ५ मंत्रीपदे द्यावीत, अशी मागणी राज्याच्या वक्फ बोर्डाने केली आहे.

कर्नाटकात काँग्रेस सरकार आल्यावरची स्थिती जाणा !

बेळगाव उत्तर मतदारसंघात काँग्रेसच्या विजयानंतर ‘आर्.पी.डी. क्रॉस’जवळ जमलेल्या कार्यकर्त्यांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. या संदर्भातील एक ‘व्हिडिओ’ही सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला आहे.