इस्लामी देशांतील हिंदूंविषयी नसीरुद्दीन शाह कधी बोलणार ?

इस्लामी देशांतील हिंदूंविषयी नसीरुद्दीन शाह कधी बोलणार ?

‘देशात २० कोटी मुसलमान आहेत. त्यांना तुम्ही (हिंदू) रातोरात नष्ट करू शकत नाही. मुसलमानांवर आक्रमण झाले, तर आम्ही या विरोधात लढा देऊ’, असे विधान अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी केले आहे.

न्यायव्यवस्थेचे भारतीयकरण आवश्यक !

न्यायव्यवस्थेचे भारतीयकरण आवश्यक !

मनु, चाणक्य आणि बृहस्पति यांनी विकसित केलेली पुरातन भारतीय न्यायव्यवस्थाच भारतासाठी योग्य आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अब्दुल नझीर यांनी व्यक्त केले आहे.

‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देणार्‍या चित्रपटाला वैध मार्गाने विरोध करा !

‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देणार्‍या चित्रपटाला वैध मार्गाने विरोध करा !

‘अतरंगी रे’ या हिंदी चित्रपटतून ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देण्यात आले आहे.  या चित्रपटात हिंदु नायिकाचे कुटुंबीय मुसलमान नायकाला जिवंत जाळतात. यातून हिंदू ‘हिंसाचारी’, तर मुसलमान ‘पीडित’ दाखवण्यात आले आहेत.

धर्मांधांची आक्रमणे हिंदु राष्ट्र अपरिहार्य करतात !

धर्मांधांची आक्रमणे हिंदु राष्ट्र अपरिहार्य करतात !

आगरा (उत्तरप्रदेश) येथील आलमगंज चौकीजवळ राधाकृष्ण मंदिरजवळ दारू पिऊन गोंधळ घालणार्‍या धर्मांधांना रा.स्व. संघाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केल्याने धर्मांधांच्या जमावाने संघ कार्यालयाची तोडफोड करत त्यांना मारहाण केली.

अशी मागणी करण्याचे धाडस होतेच कसे ?

अशी मागणी करण्याचे धाडस होतेच कसे ?

हिंदूंचे पवित्र तीर्थस्थळ असणार्‍या द्वारका बेटावरील २ द्वीपांवर सुन्नी वक्फ बोर्डाने दावा करत गुजरात उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. द्वारका बेटावर एकूण ८ लहान द्वीप आहेत.

असा कायदा संपूर्ण देशात करायला हवा !

असा कायदा संपूर्ण देशात करायला हवा !

आसाममध्ये आता गोतस्करांनी गेल्या ६ वर्षांत अवैध पशू व्यापारातून मिळवलेली संपत्ती जप्त करण्याचा अधिकार पोलिसांना देण्यात आला आहे. तसेच गोतस्करांकडून जप्त केलेल्या वाहनांचा आता लिलाव करता येणार आहे.

सरकारी पैसा मंत्र्यांकडून वसूल करा !

सरकारी पैसा मंत्र्यांकडून वसूल करा !

केरळ राज्याच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या आघाडी सरकारमधील क्रीडा, वक्फ आणि हज यात्रा यांचे मंत्री व्ही. अब्दुरहिमन हे सरकारी खर्चातून वैद्यकीय कारणांसाठी २० दिवसांसाठी अमेरिकेला जाणार आहेत.

भ्रष्टाचारी काँग्रेसवर बंदी घाला !

भ्रष्टाचारी काँग्रेसवर बंदी घाला !

पंजाबमधील काँग्रेसचे सर्व आमदार वाळूच्या अवैध व्यापारात गुंतले आहेत; मात्र मी कुणाचेही नाव सार्वजनिक करणार नाही, असा आरोप पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी पत्रकारांशी बोलतांना केला.

भारतात असे कधी होणार ?

भारतात असे कधी होणार ?

फ्रान्सच्या गृहमंत्र्यांनी देशातील एका मशिदीला ६ मासांसाठी बंद करण्याची घोषणा केली आहे. या मशिदीच्या इमामाकडून दिली जाणारी कट्टरतावादी धार्मिक भाषणे रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.

हिंदूंनाही गुरुवारची सुट्टी द्या !

हिंदूंनाही गुरुवारची सुट्टी द्या !

मुसलमानबहुल लक्षद्वीपमध्ये सरकारने तेथील शाळांना शुक्रवारऐवजी इतर राज्यांप्रमाणेच रविवारची साप्ताहिक सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र यामुळे येथे  मुसलमानांकडून विरोध होऊ लागला आहे.