अशा हिंदुद्वेषी काँग्रेसचे भविष्य अंध:कारमयच होणार !
आज राज्यघटनेची शपथ घेऊन जे पदावर बसले आहेत, ते पंतप्रधान जर हिंदु राष्ट्राची गोष्ट करत असतील, तर त्यांनी त्यागपत्र दिले पाहिजे, अशी गरळओक काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केली.
आज राज्यघटनेची शपथ घेऊन जे पदावर बसले आहेत, ते पंतप्रधान जर हिंदु राष्ट्राची गोष्ट करत असतील, तर त्यांनी त्यागपत्र दिले पाहिजे, अशी गरळओक काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केली.
१४ ऑगस्ट हा १०० टक्के इस्लामी आतंकवादी देश असलेल्या पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन आहे. पाकिस्तान हे पृथ्वीवरील नरक आहे, असे ट्वीट नेदरलँड्सच्या ‘पार्टी फॉर फ्रीडम’ या राजकीय पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार गीर्ट विल्डर्स यांनी केले आहे.
पाकिस्तानच्या १४ ऑगस्ट या दिवशी झालेल्या स्वातंत्र्यदिनी पाकचे सैन्यदलप्रमुख असीम मुनीर म्हणाले की, ज्याप्रमाणे ७६ वर्षांपूर्वी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, त्याचप्रमाणे काश्मीरच्या लोकांनाही त्यांना कह्यात ठेवणार्या शक्तींपासून स्वातंत्र्य मिळेल.
राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आसाम राज्यातील मतदारसंघांच्या केलेल्या फेररचनेत ५ मुसलमानबहुल विधानसभा क्षेत्रांमधील उमेदवार हे मुसलमानांऐवजी आता अनुसूचित जाती आणि जमाती यांचे असणार आहेत. यामुळे तेथील धर्मांध मुसलमान संतप्त झाले आहेत.
उत्तरप्रदेशचे कानपूर शहर ख्रिस्ती मिशनर्यांच्या धर्मांतराच्या कारवायांचा गड बनले आहे. शहरातील घाटमपूर, श्यामनगर, रावतपूर, कर्नलगंज आणि मुन्नीपुरवा या भागातील शेकडो हिंदु कुटुंबांना आमीष दाखवून धर्मांतरित करण्यात आले आहे.
मध्यप्रदेश राज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा झाल्यानंतर प्रथमच एका मुसलमानाला शिक्षा झाली. इंदूर येथील महंमद साबिर खान याला एका अल्पवयीन हिंदु मुलीवर बलात्कार करून तिचे धर्मांतर करण्याच्या आरोपाखाली २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
कोलकाता उच्च न्यायालयाने भूमी वादाच्या एका प्रकरणात स्वयंभू शिवलिंगाला हटवण्याचा आदेश दिल्याचा निर्णय लिहित असतांना उप निबंधक विश्वनाथ राय अचानक खाली कोसळून बेशुद्ध पडले. त्यामुळे न्यायमूर्ती जॉय सेनगुप्ता यांनी तत्परतेने आदेश मागे घेतला.
काँग्रेसचे राहुल गांधी हे लोकसभेत येताच बरळले. ते म्हणाले की, तुम्ही (मोदी शासनाने) मणीपूरमध्ये ‘भारतमाते’ची हत्या केली. पंतप्रधान मणीपूरला भारताचा भाग मानीत नाहीत. त्यामुळे ते अजूनही मणीपूरला गेलेले नाहीत.
लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांच्या वाढत्या प्रकरणांवर आळा घालण्यासाठी मध्यप्रदेशातील अशोकनगर जिल्ह्यातील ४ गावांत मुसलमान अन् ख्रिस्ती व्यापार्यांवर प्रवेशबंदी लादण्यात आली आहे. ग्रामपंचायतीने हा निर्णय सर्वानुमते घेतला.
भारताच्या सीमा बळकट केल्या जात आहेत. वर्ष २०१४ नंतर भारताने सीमेवरील परिसरात पायाभूत सुविधा उभारण्यास आरंभ केला, असे वक्तव्य परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी केले.