अखंड भारताचे शिल्पकार : लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल !
देशसेवेसाठी कित्येक वेळा ते कारागृहातही गेले. त्यांच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन बारडोलीच्या महिलांनी त्यांना ‘सरदार’ ही पदवी दिली. वर्ष १९३१ मध्ये कराची अधिवेशनात त्यांना काँग्रेसचे अध्यक्ष बनवण्यात आले.
गोवर्धनगिरिधारी श्रीकृष्ण !
भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून धरून इंद्राच्या कोपापासून गोकुळवासियांचे रक्षण केले. ‘आपला अन्नदाता आणि रक्षणकर्ता गोवर्धन पर्वतच आहे’, याची सर्वांना खात्री पटली अन् त्यांची श्रीकृष्णावरील भक्तीही वाढली. शेवटी इंद्र थकला आणि त्याने वृष्टी बंद केली. पुन्हा सर्व लोक गोकुळात आले.
नरकासुरवध !
नरकासुर वध ! श्रीकृष्णाची ही कामगिरी अलौकिक अशी होती. नरकासुराच्या वधामुळे जिकडे तिकडे आनंद झाला. शत्रूच्या रक्ताचा टिळा लावून श्रीकृष्ण घरी येताच त्यास मंगलस्नान घालण्यात आले. या ‘विजयाची स्मृती’ म्हणून आश्विन कृष्ण चतुर्दशी हा दिवस सर्व भारतीय लोक ‘नरकचतुर्दशी’ म्हणून साजरा करत असतात.’
दत्तावतार श्रीपाद श्रीवल्लभ
श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्तात्रयांचे अवतार म्हणून प्रसिद्ध आहेत. लहानपणीच ते सर्वज्ञ होते. मुंजीच्या प्रसंगी त्यांनी चारही वेद मुखाने म्हणून दाखवले. त्यांची बुद्धीमत्ता अलौकिक होती. त्यांनी लग्न करण्याचे नाकारले; कारण आधीच त्यांचे लग्न विरक्तीशी झाले होते.
हिंदवी स्वराज्याचा आरमारदिन
छत्रपती शिवाजी महाराज सर्वांनाच प्रातःस्मरणीय आहेत. त्यांच्या क्षात्रतेजाचे स्मरण आपण नेहमीच ठेवले पाहिजे. दिवाळीचा हा पहिला दिवसच या परमप्रतापी राष्ट्रपुरुषाच्या विजिगीषू वृत्तीचा जयघोष करत साजरा करूया !