धार्मिक ग्रंथांचा अवमान करणे, हा गुन्हा असल्याचा कायदा करा !

उत्तरप्रदेशातील आमदार डॉ. राजेश्‍वर सिंह यांची केंद्रीय कायदामंत्री आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी

पिंपरी-चिंचवड (पुणे) येथे श्री गणेशमूर्ती विक्री दुकानांना परवाना नसल्यास उपायुक्तांची कारवाईची चेतावणी !

आतापर्यंत महापालिकेकडे १९३ अर्ज आले आहेत. त्यावर तात्काळ कार्यवाही करून परवाना दिला जात आहे. व्यवसाय परवाना असल्याविना मूर्ती विक्री केल्यास कारवाई केली जाणार आहे.

नवी मुंबई येथे अमली पदार्थ विकणार्‍या ६ नायजेरियन महिला कह्यात !

नवी मुंबईत अवैधरित्या रहाणार्‍या विदेशी नागरिकांच्या विरोधात सर्वत्र धाडी घालण्यात येत आहे. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाल्यासच  अमली पदार्थ विक्रीचे समूळ उच्चाटन होईल !

नाशिक येथे २ ठिकाणच्या धाडीत ५९ सहस्र रुपयांचा भेसळीचा माल जप्त !

अन्न आणि औषध प्रशासन विभागाने अन्न भेसळ करणार्‍यांवर कायमस्वरूपी कारवाई केली, तरच भेसळीचे प्रकार थांबतील !

वणी (यवतमाळ) येथे गोवंशियांच्या मांसविक्री प्रकरणी ३ धर्मांधांना अटक !

कायद्याची तीळमात्रही भीती नसलेले धर्मांध आणि गोवंश हत्याबंदीची कठोर कारवाई करण्यास कचरणारे पोलीस प्रशासन यांमुळे अशी स्थिती निर्माण झाली आहे.

आमीष दाखवून फसवणूक !

‘ए.आर्. हॉलिडेज’ आस्थापनाचे प्रमुख अमित राणा यांसह तिघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

जालना येथील मराठा आंदोलकांवरील लाठीमाराचे महाराष्ट्रात हिंसक पडसाद !

दगडफेकीत बरेच पोलीस कर्मचारी घायाळ झाल्यानंतर पोलिसांनी लाठीमार केला. पोलिसांनी जर लाठीमार केला नसता, तर पोलिसांना पुष्कळ वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागले असते.

‘लिव्ह इन रिलेशनशिप’द्वारे भारतातील विवाहसंस्था पद्धतशीरपणे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सिद्धार्थ यांनी सांगितले की, लिव्ह इन रिलेशनशिप या देशात विवाहसंस्था कालबाह्य झाल्यानंतरच सामान्य मानली जाईल.

काश्मीरमध्ये ३० वर्षांपासून पसार असणार्‍या ८ आतंकवाद्यांना अटक !

पसार आतंकवाद्यांना नोकरी कशी मिळाली ? त्यांना कुणी साहाय्य केले ? आदींचा शोध घेऊन संबंधितांवरही कारवाई होणे आवश्यक आहे !

(म्हणे) ‘देहलीत निर्माण केलेली कारंजी ही शिवलिंग नाहीत, तर कलाकृती आहे !’ – उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना

कलाकृती शिवलिंगाच्या आकाराप्रमाणे असणे, हीसुद्धा चूकच आहे; कारण त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे यास उत्तरदायी असणार्‍यांविरुद्ध सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे !