काळ्या बाजारात विक्रीसाठी असलेले स्वस्त धान्याचे ८९० गोणी तांदूळ नागपूर पोलिसांकडून जप्त !

गोदामात एकूण ४४५ क्विंटल तांदूळ साठवून ठेवला होता. धक्कादायक गोष्ट म्हणजे गेल्या ८ मासांपासून सार्वजनिक वितरण प्रणालीतील धान्याची काळ्या बाजारात सर्रासपणे विक्री चालू असल्याचे उघड झाले आहे.

शासकीय कामकाजातील भ्रष्टाचाराचा भांडाफोड करणार्‍या ‘कॅग’च्या आक्षेपांकडे सरकारचे दुर्लक्ष !

शासकीय कामकाजात अब्जावधी रुपयांच्या निधीचा दुरुपयोग झाल्याचे समोर येऊनही त्यावर सर्वपक्षीय शासनकर्त्यांकडून कोणतीच उपाययोजना न काढली न जाणे, हे देशासाठी लज्जास्पद !

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार ! – विरोधकांचा आरोप

जमियत-ए-उलेमा-ए-इस्लामचे प्रमुख फजलुर रहमान यांनी टीका करतांना म्हटले की, जर सर्व पाकिस्तानी राजकारण्यांच्या चुकीच्या कृत्यांची गणना केली, तरी त्यांची तुलना पंतप्रधान इम्रान खान यांनी केलेल्या भ्रष्टाचाराशी होऊ शकत नाही.

भ्रष्ट कर्मचार्‍यांना फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे ! – मद्रास उच्च न्यायालय

भ्रष्टाचाराचा आरोप असणार्‍यांना पदोन्नती देणार्‍यांवरही कारवाई केली पाहिजे ! भारतात आज भ्रष्टाचार शिष्टाचार झाला असून भ्रष्ट लोकांनाच मान दिला जात आहे, हेच भ्रष्ट कर्मचार्‍यांना पदोन्नती दिल्याचे प्रकरण दर्शवते !

मुंबई महापालिकेच्या आश्रय योजनेत १ सहस्र ८४४ कोटी रुपयांचा घोटाळा !

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आश्रय योजनेतील झालेल्या अपव्यवहाराची चौकशी करावी, असा आदेश लोकायुक्तांना दिला आहे.

आरोग्य भरतीचा पेपर ‘न्यासा’ आस्थापनातूनही फुटल्याचे उघड !

दोन एजंटानी फोडलेले पेपर काही परीक्षार्थींना ५ ते ८ लाख रुपये घेऊन दिल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणी आतापर्यंत ५ गुन्हे नोंद झाले असून २८ आरोपींना अटक केली आहे.

अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीकडून आरोपपत्र प्रविष्ट !

यामध्ये अनिल देशमुख यांचे सचिव संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांनाही पोलिसांनी सहआरोपी केले आहे. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांनी बारमालकांकडून १०० कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितल्याचा आरोप केला आहे.

बनावट (खोटे) खटले प्रविष्ट करून पैसे कमावणारे भ्रष्ट अधिवक्ते !

अधिवक्ता समूह आणि न्यायव्यवस्था यांच्यावर नागरिकांचा विश्वास टिकून राहील. काही चुकीच्या लोकांमुळे न्यायसंस्था अपकीर्त न होता तिच्यावरील विश्वास टिकून रहाणे महत्त्वाचे आहे.

विनाअनुदानित शाळांतील शिक्षकेतर पदांच्या नियुक्त्यांसाठी शिक्षण विभागातीलच अधिकारी पैसे घेतात !

सर्वच क्षेत्रांतील भ्रष्टाचार्‍यांच्या संदर्भात अशी तत्परतेने कारवाई झाली, तर भ्रष्टाचाराला खीळ बसेल !

सरपंचाने १५ लाख रुपयांहून अधिक पैशांचा भ्रष्टाचार केल्यासच माझ्याकडे तक्रार करा !

एखादा सरपंच जर १५ लाख रुपयांचा भ्रष्टाचार करत असेल, तर नगरसेवक, जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार, खासदार, राज्याचे मंत्री आणि केंद्रातील मंत्री किती भ्रष्टाचार करत असतील, याची कल्पना करता येत नाही !