भ्रष्ट कर्मचार्‍यांना फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे ! – मद्रास उच्च न्यायालय

मद्रास विश्‍वविद्यालयाच्या दोघा भ्रष्ट कर्मचार्‍यांना पदोन्नती दिल्याचे प्रकरण

भ्रष्टाचाराचा आरोप असणार्‍यांना पदोन्नती देणार्‍यांवरही कारवाई केली पाहिजे ! भारतात आज भ्रष्टाचार शिष्टाचार झाला असून भ्रष्ट लोकांनाच मान दिला जात आहे, हेच भ्रष्ट कर्मचार्‍यांना पदोन्नती दिल्याचे प्रकरण दर्शवते ! – संपादक

चेन्नई (तमिळनाडू) – मद्रास उच्च न्यायालयात भ्रष्टाचाराचा आरोप असणार्‍या मद्रास विश्‍वविद्यालयाच्या दोघा कर्मचार्‍यांना पदोन्नती देण्याच्या विरोधात याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. त्या याचिकेवर सुनावणी करतांना ‘अशा कर्मचार्‍यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे’, असे मत मद्रास उच्च न्यायालयाने मांडले आहे. वीरापंडी आणि सेल्वी अशी या दोघा कर्मचार्‍यांची नावे असून त्यांना साहाय्यक ग्रंथपाल म्हणून पदोन्नती देण्यात आली होती.