(म्हणे) ‘भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश मिळून अखंड भारत झाला, तर मुसलमान पंतप्रधान होईल !’ – शोएब जमाई

‘अखंड भारता’कडे मुसलमान कोणत्या दृष्टीने पहातात, हे हिंदूंनी लक्षात घेण्यासारखे आहे. याचा विचार करूनच भारताला प्रथम हिंदु राष्ट्र करून देशात हिंदूंची स्थिती भक्कम करण्याची का आवश्यकता आहे, हे लक्षात येते !

‘चॅटजीपीटी’चे निर्माते सॅम ऑल्टमन यांनी घेतली पंतप्रधान मोदी यांची भेट !

भारतासमोर असणार्‍या संधी, त्यासाठी भारताने काय काय केले पाहिजे ?, तसेच चढ-उतार रोखण्यासाठी जागतिक नियमन करण्यासंदर्भात पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा झाली-ऑल्टमन

कॅनडातील ७०० भारतीय विद्यार्थ्यांना बनावट कागदपत्रांमुळे देश सोडण्याची नोटीस !

अशा परिस्थितीत पंजाबचे अनिवासी भारतीय व्यवहार मंत्री कुलदीपसिंह धालीवाल यांनी परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांच्याकडे या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

जगाची भारताला ऐकायची इच्छा ! – परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

राहुल गांधी त्यांच्या कथा देशात चालल्या नाहीत म्हणून परदेशात जातात, अशी टीका !

भारताच्या संसदेत लावण्यात आलेले अखंड भारताचे मानचित्र हे राजनैतिक नाही, तर सांस्कृतिक ! – नेपाळचे पंतप्रधान ‘प्रचंड’

नेपाळच्या विरोधी पक्षांनी या मानचित्रावरून भारतावर टीका केली होती.

चीनची आक्रमकता पहाता भारत आणि अमेरिका यांनी एकत्र काम करावे !

चीनच्या आक्रमक कम्युनिस्ट पक्षाच्या समोर लोकशाही व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी भारत आणि अमेरिका यांनी एकत्र मिळून काम करण्याची आवश्यकता आहे.

बीबीसीने दिली ४० कोटी रुपयांचा कर चुकवल्याची स्वीकृती !

कर चुकवेगिरी केल्याचे आधी नाकारून वर छळ करण्यात येत असल्याचा कांगावा करणार्‍या बीबीसीवर आता नियमानुसार कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. तरच अशा ब्रिटीश आस्थापनाला वचक बसेल !

सैन्यपुरवठ्यासाठी चीनकडून अक्साई चीनमध्ये रस्ते, हेलिपोर्ट आदींचे बांधकाम !

चीन आज ना उद्या भारतावर आक्रमण करण्याचा प्रयत्न करणार, यात शंका नाही. यासाठी भारताने अधिक सतर्क राहून ‘जशास तसे’ उत्तर देण्याची सिद्धता करण्याची आवश्यकता आहे !

भारत ही जिवंत लोकशाही : देहलीत गेल्यास त्याचा अनुभव येईल ! – अमेरिका

भारत ही एक जिवंत लोकशाही असून नवी देहलीत गेल्यास त्याचा अनुभव येईल, असे विधान अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत ‘स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन्स’चे समन्वयक जॉन किर्बी यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी या जूनच्या शेवटच्या आठवड्यात अमेरिकेला जाणार आहेत.

मी परदेशात जाऊन राजकारण करत नाही ! – परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

मी परदेशात जाऊन राजकारण करत नाही आणि यापुढेही करणार नाही, असे उत्तर परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी येथे एका तरुणाने विचारलेल्या प्रश्‍नाला दिले. या तरुणाने राहुल गांधी यांचे नाव न घेता ‘अमेरिकेतील काही लोक भारताविषयी वक्तव्ये करत आहेत.