नवी देहली – ब्रिटनमधील ‘चिथम हाऊस’ संस्थेने दावा केला आहे की, चीनने अक्साई चीनपर्यंत रस्ते, चौक्या, हेलिपोर्ट आणि छावण्या बांधल्या आहेत. चिथम हाऊसने गेल्या ६ मासांतील उपग्रह छायाचित्रांच्या विश्लेषणाच्या आधारे अहवाल प्रसिद्ध केला आहे. वर्ष १९६२ च्या युद्धानंतर चीन लडाखमधील जी भूमी बळकावली, ती म्हणजे अक्साई चीन होय.
चीन एलएसी के पास लगे विवादित इलाकों में तेजी से सैन्य निर्माण में लगा हुआ है. ब्रिटिश थिंक टैंक ने छह महीने की तस्वीरों के आधार पर ये दावा किया है #AksaiChin #LAC #BritishThinkTank #IndiaChinaTension https://t.co/MdGMBTSXVk
— ABP News (@ABPNews) June 6, 2023
१. या अहवालात म्हटले आहे की, अक्साई चीन तलावाजवळील वादग्रस्त भागात हेलिपोर्ट बांधले आहे. चीन येथे १८ ‘हँगर’ (विमाने ठेवण्याची जागा) आणि लहान धावपट्टी बांधत आहे. आपत्कालीन परिस्थितीत येेथून ड्रोन, हेलिकॉप्टर आणि लढाऊ विमाने उड्डाण करू शकतात.
२. अक्साई चीनमध्ये बांधलेले रस्तेही रुंद आहेत. चौक्या, तेथील हवामानात टिकणार्या आधुनिक छावण्या, जेथे वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. यासह सौर ऊर्जा मिळवण्याची व्यवस्थही करण्यात आली आहे. वर्ष २०३५ पर्यंत चीन शिनजियांग आणि तिबेट यांना जोडणारा महामार्ग सिद्ध करण्याच्या सिद्धतेत आहे. हा रस्ता अक्साई चीनमधून जाणार आहे.
संपादकीय भूमिकाचीन आज ना उद्या भारतावर आक्रमण करण्याचा प्रयत्न करणार, यात शंका नाही. यासाठी भारताने अधिक सतर्क राहून ‘जशास तसे’ उत्तर देण्याची सिद्धता करण्याची आवश्यकता आहे ! |