वॉशिंग्टन (अमेरिका) – भारत ही एक जिवंत लोकशाही असून नवी देहलीत गेल्यास त्याचा अनुभव येईल, असे विधान अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत ‘स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन्स’चे समन्वयक जॉन किर्बी यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी या जूनच्या शेवटच्या आठवड्यात अमेरिकेला जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर जॉन किर्बी यांनी हे विधान केल्याचे सांगितले जात आहे.
#BreakingNews | “India is a vibrant democracy, go to Delhi and see for yourself, say White House officials ahead of PM Modi’s US visit @abhishekjha157 shares more details with @SakshiLitoriya_#UnitedStates #India #Democracy #WhiteHouse #PMModi #Delhi #JoeBiden pic.twitter.com/CZHWcznuDu
— News18 (@CNNnews18) June 6, 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी भेटीविषयी जॉन किर्बी म्हणाले की, आम्हाला आशा आहे की, दोन्ही देशांमधील मैत्री आणि व्यापारी भागीदारी आणखी भक्कम होईल. दोन्ही देशांमधील आर्थिक व्यापार फार मोठा आहे. अनेक पातळ्यांवर भारताला निश्चितच महत्त्व आहे. यासाठी विविध कारणेही आहेत. या सर्व सूत्रांवर बोलण्यासाठी आणि मैत्री वाढवण्याकरता आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करण्यास इच्छुक आहोत.