महाराष्ट्राला प्रगतीशील बनवण्यासह हिंदु समाजाचे रक्षण करण्याचा प्रयत्न करणार ! – नितेश राणे, मंत्री

विरोधकांच्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या (इ.व्ही.एम्.च्या) विरोधातील आंदोलनाला अर्थ नाही. आमचे सरकार हिंदुत्वनिष्ठ सरकार आहे. देशाच्या नेतृत्वाने आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह सर्व वरिष्ठ नेत्यांनी आमच्यासारख्या हिंदुत्वनिष्ठ तरुणांकडे फार मोठे दायित्व दिले आहे.

लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांच्या विरोधात सक्षम कायदा करणार ! – नितेश राणे, मंत्री, महाराष्ट्र

लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतर’ यांच्या विरोधात ५ वर्षांत सक्षम कायदा करणार आहोत. तसे आमच्या घोषणापत्रात नमूद केलेले आहे. यापूर्वी भाजपने ३७० कलम हटवणे, राममंदिर बांधणे आदी गोष्टी करण्याचे आश्वासन घोषणापत्राद्वारे दिले होते. ते पूर्ण करण्यात आले आहे.