७ ऑगस्ट: गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर (टागोर) यांचा आज स्मृतीदिन

जन-गण-मन हे भारताचे राष्ट्रगीत रचणारे गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर (टागोर) यांचा आज स्मृतीदिन

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत  ‘रालोआ’चे जगदीप धनखड विजयी !

देशाच्या १४ व्या उपराष्ट्रपती पदासाठी ६ ऑगस्ट या दिवशी झालेल्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (‘रालोआ’चे) उमेदवार जगदीप धनखड यांनी विरोधी पक्षांच्या आघाडीचे उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला.

संपूर्ण घरपट्टी भरलेल्या नागरिकांना विनामूल्य राष्ट्रध्वज !

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त सातारा नगरपालिकेच्या वतीने ज्या मिळकतधारकांनी १ एप्रिल २०२२ या दिवसापासून आपली संपूर्ण घरपट्टी भरलेली आहे, त्यांना विनामूल्य राष्ट्रध्वज देण्यात येणार आहेत, अशी माहिती सातारा नगरपालिकेचे अतिरिक्त मुख्य अधिकारी यांनी दिली.

गणेशोत्सवाच्या माध्यमातून व्यापक धर्मप्रसार करण्याचा सोलापूर येथील गणेशोत्सव मंडळांचा निर्धार !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘सार्वजनिक उत्सव आदर्शरित्या कसा साजरा करावा ?’, या विषयावर ३ ऑगस्ट या दिवशी सोलापुरातील सार्वजनिक उत्सव मंडळांची बैठक घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते.

माजी आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रभक्तीचा जागर !

ऐरोली विधानसभा क्षेत्राचे प्रथम (माजी) आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रभक्तीचा जागर करण्यात आला. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्व नागरिकांना संदीप नाईक यांनी राष्ट्रध्वज भेट दिला , तसेच ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी होऊन…

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने १३ आणि १४ ऑगस्टला सांगली येथे ‘इतिहास अभ्यासवर्ग’ !

राष्ट्रजीवन सदैव रसरशीत आणि तेजस्वी ठेवण्यासाठी देवघरातील नंदादीपासारखी समाजमनाची सतत तेलवात करावी लागते. त्यासाठीच प्रतिवर्षीप्रमाणे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने सांगली येथील धनंजय गार्डन, कर्नाळ रस्ता येथे ‘इतिहास अभ्यासवर्गा’चे आयोजन करण्यात आले आहे.

‘हिंदु युवा वाहिनी’कडून बदलापूर ते अंबरनाथ भव्य कावळ पदयात्रा पार पडली !

‘हिंदु युवा वाहिनी’कडून बदलापूर ते अंबरनाथ अशी भव्य कावळ पदयात्रा नुकतीच काढण्यात आली. या पदयात्रेमध्ये सर्व हिंदु संघटनांचे सदस्य, पदाधिकारी, हिंदु युवा वाहिनीचे सदस्य, तसेच बदलापूर आणि अंबरनाथ येथील शिवभक्त यांनी भगवे वस्त्र परिधान करून उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

महाराष्ट्रात नवीन उद्योग, गुंतवणूक, तंत्रज्ञान आणण्यासाठी ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’च्या वतीने अमेरिकेत व्यापार परिषद ! – ललित गांधी, अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स

‘इन्व्हेस्ट इन महाराष्ट्र’(महाराष्ट्रात गुंतवणूक करा) ही संकल्पना घेऊन अमेरिकेत रहाणारे भारतीय उद्योजक, गुंतवणूकदार, विशेषत: महाराष्ट्रीयन उद्योगक आणि गुंतवणूकदार यांनी महाराष्ट्रात संयुक्त उद्योग उभारावेत, तसेच नवीन गुंतवणूक करावी या उद्देशाने अमेरिकेत ११ ते १४ ऑगस्ट ‘व्यापार परिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे.

काँग्रेसचे माजी मंत्री अस्लम शेख यांना पर्यावरण मंत्रालयाची नोटीस !

काँग्रेसचे माजी मंत्री अस्लम शेख यांना राज्याच्या पर्यावरण मंत्रालयाने मढ मार्वे स्टुडिओ प्रकरणी नोटीस पाठवली आहे. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी अस्लम शेख यांच्या पाठिंब्याने मढ मार्वे येथे अनधिकृत स्टुडिओ बांधण्यात येऊन १ सहस्र कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप केला होता.

… तर स्वत:च्या मुलाचे नाव ‘औरंगजेब’ का ठेवत नाही ? – रावसाहेब दानवे, भाजप

महाराष्ट्र शासनाने ‘औरंगाबाद’ जिल्ह्याचे ‘संभाजीनगर’ असे नामांतर केले आहे; पण याला विरोध करण्यासाठी आंदोलन करण्याची आणि मोर्चा काढण्याची चेतावणी इम्तियाज जलील यांनी दिली. याविषयी एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीमध्ये दानवे यांना विचारणा केली असता त्यांनी वरील प्रश्न उपस्थित केला.