तमिळनाडूचे शिवसेनेचे प्रदेशाध्यक्ष राधाकृष्णन् यांचा भाजपमध्ये प्रवेश

श्री. राधाकृष्णन म्हणाले, “आम्ही काँग्रेस आणि द्रमुक यांच्या हाताखाली काम करू शकत नाही. शिवसेनेच्या वरिष्ठांना हे ठाऊक आहे की, आम्ही निराश आहोत. त्यामुळे आतापासून मी भाजपचा माणूस आहे, शिवसेनेचा नाही.”

भरती केंद्रासह सैनिकी रुग्णालय आणि वैद्यकीय उपकेंद्र चालू करा !

भाजप खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे मागणी

पुणे येथे शिवशाहिरांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अमित शहा यांनी श्रद्धांजली वाहिली !

अमित शहा यांनी १९ डिसेंबरच्या रात्री दिवंगत बाबासाहेब पुरंदरे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. त्याचबरोबर बाबासाहेब पुरंदरे यांचे स्वप्न असलेल्या शिवसृष्टीच्या कामाचा आढावाही त्यांनी या वेळी घेतला.

ह.भ.प. प्रज्ञाताई रामदासी यांचा ‘कीर्तनभीष्म कृतार्थता’ पुरस्काराने गौरव !

गोंदी येथे मराठवाडा नारदीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन

ओमिक्रॉनला रोखण्यासाठी नाताळ आणि ख्रिस्ती नववर्षानिमित्त कार्यक्रम आयोजित न करण्याचे मुंबई पालिका आयुक्तांचे आवाहन !

ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर ही गर्दी धोकादायक ठरू शकते. म्हणून नाताळ आणि नववर्षानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन न करण्याचे आवाहन मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी केले आहे.

एका शहरातील टपाल (पोस्ट) कार्यालयाकडून राष्ट्रध्वजाचा अनादर !

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतांनाही राष्ट्रप्रेम, राष्ट्रीयत्व, राष्ट्रध्वजाप्रती आदर, राष्ट्रकर्तव्य यांचा अभाव दिसून येणे हे देशाला लज्जास्पद नव्हे का ?

प्रलंबित मागण्यांसाठी एक दिवस ग्रामपंचायती बंद रहाणार !

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी बंद पाळणार, मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयावर मोर्चा काढण्याची चेतावणी

ईश्वरी अधिष्ठान ठेवून, तसेच आपल्यातील शौर्य जागृत करून हिंदु राष्ट्र स्थापन करायचे आहे ! – सौ. धनश्री केळशीकर, हिंदु जनजागृती समिती

छत्रपती शिवाजी महाराजांनी ईश्वरी अधिष्ठान ठेवून पाच पातशाह्या उद्ध्वस्त करून शौर्य गाजवले. आपल्यालाही ईश्वरी अधिष्ठान ठेवून शौर्य जागृत करून हिंदु राष्ट्र स्थापन करायचे आहे

कुपोषणाच्या संदर्भात कृती आराखडा सिद्ध करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश !

या वर्षी नोव्हेंबरपर्यंत मेळघाटात अनुमाने ४०० मुलांचा कुपोषणाने मृत्यू झाल्याची माहिती याचिकाकर्ते बंडू साने यांनी या वेळी उच्च न्यायालयात दिली.

अध्यात्म, संस्कृती यांचा विचार घेत भारताने विश्वगुरूच्या भूमिकेतून जगाचे नेतृत्व करावे ! – पद्मविभूषण डॉ. विजय भटकर, ज्येष्ठ संगणकतज्ञ

अध्यात्म आणि विज्ञान हे एकत्र आले पाहिजे, ही वैदिक काळापासूनची धारणा वास्तवात आल्यास भारताचे नेतृत्व जगाला मान्य करावेच लागेल, असे मत ज्येष्ठ संगणकतज्ञ पद्मविभूषण डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केले.