
कणकवली – सामाजिक माध्यमांतील ओळखीतून निर्माण झालेल्या प्रेमाचा अपलाभ घेऊन एका तरुणाने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले आणि तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर तरुणीने विवाहाविषयी विचारल्यावर तिला तरुणाने स्पष्ट नकार दिला. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तरुणीने येथील पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. या तक्रारीवरून पोलिसांनी एका युवकाला अटक केली आहे.
फेब्रुवारी २०२६ मध्ये ‘इन्स्टाग्राम’ या सामाजिक माध्यमातून संशयित आरोपी आणि पीडित युवती यांची ओळख झाली. मुंबईमध्ये रहाणारी ही पीडित युवती एप्रिल महिन्यात गावी आली असतांना आरोपीने तिला शहराजवळील एका लॉजमध्ये तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. या प्रकरणात लग्नाचे खोटे आश्वासन देऊन लैंगिक संबंध प्रस्थापित करणे, महिलेचा छळ करणे आणि धमकी देणे आदी संदर्भातील गंभीर तरतुदी या गुन्ह्यात लागू करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी संशयित तरुणाला १५ जूनला रात्री अटक केली.
महिलेला गर्भवती करून सोडून दिले : गुन्हा नोंद
अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादल्याच्या प्रकरणी मीर शाह याला अटक
आजगाव येथे ग्रामस्थांचा उद्रेक : खाण प्रकल्पासाठीचे सर्वेक्षण रोखले !
लहान बाळांना गोमांस खाण्याचा सल्ला देणार्यांवर गुन्हा नोंदवा ! – विश्व हिंदु परिषद
‘देवस्थान इनाम भूमी खालसा करा !’ – अखिल भारतीय किसान सभा
IAF Officer Wife Rape : वायूसेनेतील अधिकार्याच्या पत्नीवर बलात्कार; २ धर्मांधांना ५ दिवस पोलीस कोठडी !