उपाहारगृहात अस्वच्छता, शिळे अन्न अन् अवाढव्य दर !

पुणे – येथील स्वारगेट बसस्थानकातील उपाहारगृहावर अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी १३ जूनला रात्री धडक कारवाई करत ते थेट बंद करण्याचे आदेश दिले आहेत. उपाहारगृहातील भयानक अस्वच्छता आणि प्रवाशांच्या आरोग्याशी होणारा खेळ पाहून आयुक्तांनी हे कडक पाऊल उचलले. या धाडसी कारवाईनंतर स्वारगेट परिसरातील प्रवाशांनी मुंढे यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. एस्.टी. स्टँडवरील उपाहारगृहामध्ये नेहमीच अस्वच्छ आणि शिळे अन्न दिले जाते, तसेच दरही अवाढव्य आकारले जातात; त्यामुळे ही कारवाई योग्यच आहे, अशा प्रतिक्रिया प्रवाशांनी दिल्या आहेत. उघड्यावरील खाद्यपदार्थांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असून आता राज्यातील इतरही बसस्थानकांवर अशीच धडक मोहीम राबवावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
पुणे येथे अधिवक्ता एस्.के. जैन यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ !
पानशेत (पुणे) पूरग्रस्त सोसाट्यांचे प्रश्न ६५ वर्षांनंतरही प्रलंबित !
हडपसर येथे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याला साहिल शेख आणि त्याच्या टोळीकडून बेदम मारहाण !
कामोठे येथे भटक्या कुत्र्याचे १० जणांवर आक्रमण !
भोंदू बाबा फिरोज शेख याला २ दिवसांची पोलीस कोठडी !
पुणे शहरात १९ जुलैला ‘श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव’ !