
मुंबई – काँग्रेसचे धाराशिव येथील नेते पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा अंतिम निकाल निकाल २० जून या दिवशी लागणार आहे. १६ जून या दिवशी मुंबईतील सीबीआय न्यायालयात हा निकाल लागणार होता; मात्र काही न्यायालयीन कामकाजांची पूर्तता करण्यासाठी निकालाचा दिनांक पुढे ढकलण्यात आला.
३ जून २००६ या दिवशी मुंबईहून धाराशिव येथे चारचाकी गाडीतून जात असतांना पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. वर्ष २००९ मध्ये या प्रकरणी पवनराजे निंबाळकर यांचे राजकीय विरोधक माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह ९ जणांना अटक करण्यात आली. पद्मसिंह पाटील हे हत्येच्या कटातील मुख्य सूत्रधार असल्याचे केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने आरोपपत्रात म्हटले आहे. हे सर्व आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहेत. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या पवनराजे निंबाळकर यांच्या सख्ख्या बहीण आहेत.
सामान्य माणसाला न्याय मिळणे दुरापास्त आणि कठीण ! – ओमराजे निंबाळकर (पवनराजे निंबाळकर यांचे पुत्र)
आम्ही २० वर्षे १३ दिवस निकालासाठी संघर्ष केला आहे. माझी कुवत होती; म्हणून या प्रकरणात मी उच्च न्यायालयात पुनर्याचिका प्रविष्ट करू शकलो. सामान्य माणसाला न्याय प्राप्त करणे पुष्कळ दुरापास्त आणि कठीण आहे.
४ वर्षांनंतरही चौकशी अहवाल उघड न केल्यावरून अनिल देशमुख यांची राज्यपालांकडे तक्रार !
भारत हिंदूबहुल असल्याने धर्मनिरपेक्ष, एखादा इस्लामी देश धर्मनिरपेक्ष असल्यास सांगा ! – राजा भैया, आमदार, उत्तरप्रदेश
अश्लीलता पसरवणार्या ‘स्टँडअप कॉमेडी’ कार्यक्रमांना परिनिरीक्षण मंडळाची पूर्वानुमती अनिवार्य करा !
मधुबनी (बिहार) येथील मशिदीतून मौलाना इजहार याला अटक !
कौटुंबिक भूमी वाटणीच्या वाटपाचे धोरण सरकारकडून निश्चित !
लहान बाळांना गोमांस खाण्याचा सल्ला देणार्यांवर गुन्हा नोंदवा ! – विश्व हिंदु परिषद