केळशी येथून बेपत्ता झालेल्या २ अल्पवयीन मुलींचा शोध चालू

पणजी, १६ जून (वार्ता.) – अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादल्याच्या प्रकरणी डिचोली पोलिसांनी संशयित मीर शाह (वय २० वर्षे, रहाणारा उत्तरप्रदेश) याला अटक केली आहे. या घटनेनंतर संशयित गोव्यातून पसार झाला होता. तांत्रिक अन्वेषणाच्या आधारे पोलिसांनी उत्तरप्रदेश येथून संशयिताला कह्यात घेतले.
डिचोली येथे एका १५ वर्षांच्या मुलीच्या कुटुंबियांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अन्वेषणाला आरंभ केला होता. या वेळी संशयित आणि पीडित युवती दोघेही एका परिसरात वास्तव्यास होते, असे लक्षात आले. पीडित युवती गर्भवती राहिल्यानंतर आणि तिने एका मुलाला जन्म दिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता, गोवा बाल कायदा आणि ‘पॉक्सो’ कायदा यांखाली गुन्हा नोंदवला आहे.
केळशी येथील २ बेपत्ता मुलींचा कसून शोध चालू
मडगाव – दक्षिण गोव्यात केळशी येथे २ निरनिराळ्या प्रकरणांमध्ये २ अल्पवयीन मुली बेपत्ता झालेल्या आहेत आणि त्यांचा पोलीस कसून शोध घेत आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही घटना २४ घंट्यांच्या आत घडलेल्या आहेत. यामुळे मुलींच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे; मात्र पोलिसांनी संशयित गजाआड होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
पहिल्या घटनेत १३ जून या दिवशी सकाळी एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली. या प्रकरणी मुलीच्या आईने वेर्णा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि गोवा बाल कायदा यांच्या अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे अन् संशयितांचा शोध चालू आहे. दुसर्या प्रकरणी केळशी येथील अन्य एका कुटुंबियाने त्यांची अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली आहे. मुलीच्या कुटुंबियांच्या मते मुलीचे एका अज्ञात व्यक्तीने १४ जून या दिवशी अपहरण केले आहे. वेर्णा पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून बेपत्ता झालेल्या दोन्ही मुलींची माहिती इतर पोलीस ठाणी, तसेच शेजारील राज्ये यांना दिली आहे. पोलिसांनी बेपत्ता मुलींचा शोध घेण्यासाठी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
‘नाईट क्लब’ना आता केवळ बंद खोलीत ध्वनीक्षेपकाला अनुमती
महिलेला गर्भवती करून सोडून दिले : गुन्हा नोंद
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार : एका तरुणाला अटक
आजगाव येथे ग्रामस्थांचा उद्रेक : खाण प्रकल्पासाठीचे सर्वेक्षण रोखले !
मधुबनी (बिहार) येथील मशिदीतून मौलाना इजहार याला अटक !
लहान बाळांना गोमांस खाण्याचा सल्ला देणार्यांवर गुन्हा नोंदवा ! – विश्व हिंदु परिषद