मराठीतील नामफलक न लावणार्या १ सहस्र १२४ व्यावसायिकांवर कारवाई
मुंबई महापालिकेचा स्तुत्य प्रयत्न !
मुंबई – मुंबई महापालिका क्षेत्रातील दुकाने आणि आस्थापने यांच्यावर मराठी भाषेतील नामफलक सक्तीने लावण्याच्या नियमाच्या कार्यवाहीसाठी प्रशासनाने राबवलेल्या विशेष मोहिमेचा पहिला टप्पा १३ जून या दिवशी पूर्ण झाला. गेल्या महिनाभरात पालिकेने केलेल्या व्यापक पडताळणीत ३५ सहस्र ४२८ आस्थापनांची पहाणी करण्यात आली. त्यात नियमांचे उल्लंघन करणार्या १ सहस्र १२४ व्यावसायिकांवर दंडात्मक कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
अपघातात ४ पादचारी घायाळ
कळंबोली – येथे एका भरधाव चारचाकीने पदपथावरील चौघांना चिरडले. यात चारही पादचारी गंभीर घायाळ झाले आहेत. त्यांच्यावर उपचार चालू आहेत. या प्रकरणी चालक डॉ. संजय बरनवाल यांना कह्यात घेण्यात आले आहे. हा अपघात अत्यंत थरारक होता. अपघात पाहून प्रत्यक्षदर्शी हादरून गेले होते.
विमानतळ लिंक पुलाचे लवकरच लोकार्पण !
नवी मुंबई – येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाशी संपर्क साधणार्या ‘विमानतळ लिंक उड्डाणपुला’चे महिन्याभरात लोकार्पण होण्याची शक्यता आहे. हा पूल खांदेश्वर रेल्वेस्थानक, पनवेल, जे.एन्.पी.ए. बंदर परिसर यांना जोडला जाणार आहे. हा पूल कार्गाे (माल) वाहतुकीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
मुंबईच्या महापौरांच्या गाडीला अपघात !
मुंबई – मुंबईच्या महापौर सौ. रितू तावडे यांच्या ताफ्याला शीव पुलावर अपघात झाला. दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात तीन गाड्या एकमेकांना धडकल्या. महापौर आणि ताफ्यातील सर्व कर्मचारी सुरक्षित असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातानंतर महापौरांचा प्रवास थांबू नये, यासाठी तातडीने पालिकेच्या ताफ्यातील दुसरे पर्यायी वाहन मागवण्यात आले.

पुणे येथे ख्रिस्ती धर्मगुरुंसह ८ जणांविरुद्ध गुन्हा नोंद !
‘नाईट क्लब’ना आता केवळ बंद खोलीत ध्वनीक्षेपकाला अनुमती
स्वारगेट (पुणे) बसस्थानकातील अस्वच्छ उपाहारगृह तुकाराम मुंढे यांनी केले बंद !
अश्लीलता पसरवणार्या ‘स्टँडअप कॉमेडी’ कार्यक्रमांना परिनिरीक्षण मंडळाची पूर्वानुमती अनिवार्य करा !
कौटुंबिक भूमी वाटणीच्या वाटपाचे धोरण सरकारकडून निश्चित !
लहान बाळांना गोमांस खाण्याचा सल्ला देणार्यांवर गुन्हा नोंदवा ! – विश्व हिंदु परिषद