५-१० माणसे एकत्र आली तरी…
झाडे आणि भिन्न प्रकृतीची माणसे यांतील भेद दाखवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
झाडे आणि भिन्न प्रकृतीची माणसे यांतील भेद दाखवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘कुठे पृथ्वीवर राज्य करण्याचे ध्येय असणारे इतर पंथ, तर कुठे ‘प्रत्येकाला ईश्वरप्राप्ती व्हावी’, हे उदात्त ध्येय असणारा हिंदु धर्म !’
‘स्वातंत्र्यापासून आतापर्यंत भारतात राज्य करणार्या एकाही राजकीय पक्षाने जनतेला साधना शिकवून सात्त्विक न केल्याने भारतात प्रतिदिन अनेक तर्हेचे सहस्रो गुन्हे होत आहेत !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘ईश्वरप्राप्तीसाठी तन-मन-धनाचा त्याग करायचा असतो. त्यामुळे आयुष्य धन मिळवण्यात फुकट घालवण्यापेक्षा सेवा करून धनाबरोबर तन आणि मन यांचाही त्याग केला, तर ईश्वरप्राप्ती लवकर होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘मायेतील विषय लवकर विसरले जातात. त्यामुळे पहिले आणि दुसरे महायुद्धच नाही, तर नोबेल पारितोषिक मिळवणारे शास्त्रज्ञ यांचीही नावे २५ ते ५० वर्षांत कुणाला ज्ञात नसतात.
‘पंचज्ञानेंद्रिये नाक (गंध), जीभ (चव), डोळे (दृश्य), त्वचा (स्पर्श) आणि कान (ऐकणे) हे अनुभव घेतात; पण त्यातून मिळणारे सुख-दुःख मनालाच मिळते.’
‘सात्त्विक व्यक्तींच्या व्यष्टी जीवनाचे ध्येय असते ईश्वरप्राप्ती, तर समष्टी जीवनाचे ध्येय असते रामराज्य !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘एखाद्या सात्त्विक राजाचे चरित्र वाचून थोडा वेळ उत्साह वाटतो; पण ऋषिमुनींचे चरित्र आणि शिकवण वाचून अधिक काळ उत्साह वाटतो अन् साधनेला दिशा मिळते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘अध्यात्माचा अभ्यास आणि साधना केल्यावर समजते की, विज्ञान हे बालवाडीतील शिक्षणासारखे आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘कुठे स्वेच्छेने वागण्यास उत्तेजन देऊन मानवाला अधोगतीला नेणारे बुद्धीप्रामाण्यवादी, तर कुठे मानवाला स्वेच्छेचा त्याग करायला शिकवून ईश्वरप्राप्ती करून देणारे संत !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले