समाधीपेक्षा आत्मज्ञानाने स्थायी लाभ !

समाधीमधून व्युत्थान होऊन, म्हणजे पुन्हा जागृत अवस्थेत येऊन, संसार-व्यवहार मागे लागतो. पण अज्ञानी व्यक्तीचे अज्ञान नष्ट होऊन आत्मज्ञान झाल्यावर पुन्हा कधीही त्यातून व्युत्थान म्हणजे पुन्हा अज्ञानात जाणे, होत नाही.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘मंदिरातील कर्मचारी दर्शनार्थींना दर्शन देण्याव्यतिरिक्त आणखीन काय करतात ? त्यांनी दर्शनार्थींना धर्मशिक्षण दिले असते, साधना शिकवली असती, तर हिंदूंची आणि भारताची अशी केविलवाणी स्थिती झाली नसती.’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘अध्यात्माचा अभ्यास आणि साधना केल्यावर समजते की, विज्ञान हे बालवाडीतील शिक्षणासारखे आहे.’

नावापासूनच इंग्रजाळलेला ‘काँग्रेस’ पक्ष देशाचे भले काय करणार ?

‘नावही इंग्रजी भाषेत असणार्‍या ‘काँग्रेस’ पक्षाला देशाभिमान किती असणार ? देश स्वतंत्र होऊन आज ७४ वर्षे झाल्यावर या पक्षाने केलेल्या कार्यावरून ते सिद्धच होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

युगानुयुगे परिपूर्ण असलेली संस्कृत भाषा

‘युगानुयुगे संस्कृत व्याकरण तेच आहे. त्याच्यात कुणीच काहीच पालट केलेला नाही. याचे कारण ते पहिल्यापासून परिपूर्ण आहे. याउलट जगातील सर्वच भाषांतील व्याकरण पालटत असते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले   

हिंदूंनी धर्माचे महत्त्व लक्षात घेऊन एकत्र येणे अत्यावश्यक !

‘भारतातील हिंदूंमध्ये हिंदु धर्म सोडला, तर भाषा, सण, उत्सव, कपडे इत्यादी विविध राज्यांमध्ये निरनिराळे आहेत. त्यामुळे हिंदूंना केवळ धर्मच एकत्र आणू शकतो. हिंदूंनी धर्माचे महत्त्व आतातरी लक्षात घेऊन सर्वांना एकत्र करण्याचा प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे.’

साधनेचा साठा आपल्या संग्रहात असणे आवश्यक !

‘अडचणीच्या वेळी साहाय्य व्हावे; म्हणून आपण अधिकोषात (बँकेत) पैसे ठेवतो. त्याचप्रमाणे संकटाच्या वेळी साहाय्य व्हावे; म्हणून साधनेचा साठा आपल्या संग्रहात असणे आवश्यक आहे. त्यामुळे संकटसमयी आपल्याला साहाय्य होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

फटाके फोडणारे हे देशद्रोहीच !

‘भारत दारिद्र्यात असतांना फटाक्यांच्या माध्यमांतून कोट्यवधी रुपये जाळणारे देशद्रोहीच होय.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

हिंदूंनो, फटाक्यांचे दुष्परिणाम जाणा !

सध्या गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र फटाके मोठ्या प्रमाणात फोडले जातात. या फटाक्यांच्या माध्यमातून होणारे ध्वनीप्रदूषण, वायूप्रदूषण याचबरोबर आध्यात्मिक स्तरावर होणारे नकारात्मक परिणाम बघता, याचे तोटेच अधिक आहेत.

हिंदूंच्या दुःस्थितीमागील कारण !

मशिदी आणि चर्च यांमध्ये साधना शिकवतात अन् करून घेतात. हिंदूंच्या एकाही देवळात असे करत नसल्यामुळे हिंदूंची स्थिती केविलवाणी झाली आहे.