कलियुगात ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन’ हाच साधनेचा पाया आहे !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘सत्य, त्रेता आणि द्वापर या युगांत माणसे सात्त्विक होती. त्यांच्यामध्ये स्वभावदोष आणि अहं अल्प होते. त्यामुळे ते कोणत्याही योगमार्गाने साधना करू शकत असत. आता कलियुग आहे. आता सर्वसामान्य मनुष्यामध्ये स्वभावदोष आणि अहं यांचे प्रमाण अधिक असल्यामुळे, म्हणजे तो सात्त्विक नसल्याने त्याला साधना करणे अशक्यप्राय होते. कलियुगातील मनुष्याने प्रथम स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन केल्यास तो सात्त्विक होऊन साधना करू शकतो; म्हणून सनातन संस्थेत स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यास प्राधान्य दिले आहे.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (६.९.२०२१)


मृत्यू संकट नव्हे, तर संकटांतून सोडवणारा आशीर्वाद वाटणे !

‘७० – ७५ वर्षे आयुष्य जगल्यानंतर काही जणांना जीवनात आलेल्या कटु अनुभवांमुळे जगाचा कंटाळा येतो. अशा परिस्थितीत ‘बाहेर कुणाशी संपर्क नको. ‘मी आणि माझे जग’, यात रहावे’, असे त्यांना वाटते. महत्त्वाचे म्हणजे पुढे ‘आता लवकरच मृत्यू येऊन माझी या जगातून सुटका व्हावी’, असे वाटू लागल्यावर काही जणांना मरणाची ओढ लागते आणि मृत्यू हा संकट नव्हे, तर संकटांतून सोडवणारा आशीर्वाद वाटतो !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२७.९.२०२१)