उथळ विचारांचे अहंकारी बुद्धीप्रामाण्यवादी !

उथळ विचारांचे अहंकारी बुद्धीप्रामाण्यवादी !

‘आंधळ्यांना स्थूल जग दिसत नाही, तसे साधना न करणार्‍यांना आणि बुद्धीप्रामाण्यवाद्यांना सूक्ष्म जग दिसत नाही. आंधळा ‘दिसत नाही’, हे मान्य करतो; पण बुद्धीप्रामाण्यवादी ‘सूक्ष्म जग असे काही नसते’, असे अहंकाराने म्हणतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अनंत कोटी ब्रह्मांडांचा पालनकर्ता ईश्वर !

अनंत कोटी ब्रह्मांडांचा पालनकर्ता ईश्वर !

‘कुठे कुटुंबाचे किंवा आपल्या जातीबांधवांचे हित पहाणारे संकुचित वृत्तीचे मानव, तर कुठे अनंत कोटी ब्रह्मांडांतील प्राणीमात्रांचे हित सांभाळणारा ईश्‍वर !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

स्वभाषाप्रेम नष्ट करणार्‍या शासनकर्त्यांना देव क्षमा करणार नाही !

स्वभाषाप्रेम नष्ट करणार्‍या शासनकर्त्यांना देव क्षमा करणार नाही !

स्वातंत्र्योत्तर काळातील शासनकर्त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे हिंदूंचे स्वभाषाप्रेमासह राष्ट्र आणि धर्म प्रेमही नष्ट होत चालले आहे. शासनकर्त्यांच्या या राष्ट्रीय पातकाला देव क्षमा करणार नाही. भावी हिंदु राष्ट्रात ‘स्वभाषाभिमान बाळगणे’, हा धर्मच असेल !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘बुद्धीप्रामाण्यवादी आणि जात्यंध यांच्यामुळे हिंदूंची झालेली अतोनात हानी !

‘बुद्धीप्रामाण्यवादी आणि जात्यंध यांच्यामुळे हिंदूंची झालेली अतोनात हानी !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांमुळे हिंदूंची धर्मावरील श्रद्धा उडाली. जात्यंधांमुळे हिंदूंची आपसात फूट झाली. त्यामुळे भारतात बहुसंख्य असूनही ते इतर धर्मियांकडून आणि नक्षलवाद्यांकडून मार खात आहेत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

राजकारणी हे लक्षात घेतील का ?

राजकारणी हे लक्षात घेतील का ?

राजकारण्यांना ‘मत द्या’ असे आवाहन करावे लागते, यावरून ‘त्यांचे काही कार्य नाही’, हे लक्षात येते. कार्य चांगले असल्यास मत मागावे लागत नाही, तर जनता स्वत:हून देते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

साधनेचे महत्त्व !

साधनेचे महत्त्व !

‘निवडून येण्यासाठी राजकारण्यांना जनतेला खुश करावे लागते. याउलट साधना करणार्‍याला देव स्वतःहून निवडतो !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

निवडणुका लढवणार्‍यांनो, हे लक्षात घ्या !

निवडणुका लढवणार्‍यांनो, हे लक्षात घ्या !

‘अनंत कोटी ब्रह्मांडांवर राज्य करायला ईश्‍वराला निवडणूक लढवावी लागत नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यासाठी समष्टी साधना आवश्यक !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यासाठी समष्टी साधना आवश्यक !

‘व्यष्टी साधनेत एकाच देवतेची उपासना असते; पण समष्टी साधनेत अनेक देवतांची उपासना असते. लष्करात पायदळ, रणगाडे, हवाईदल, नाविकदल इत्यादी अनेक विभाग असतात. त्याप्रमाणे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या समष्टी कार्यात अनेक देवतांची उपासना, यज्ञ-याग इत्यादी करावे लागते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

बोलतांना शिव्या देऊ नका !

बोलतांना शिव्या देऊ नका !

‘नेहमीचे बोलतांना आणि भाषणात शिव्या देणार्‍यांच्या बोलण्याची, भाषणाची परिणामकारकता तमोगुण वाढल्याने अल्प होते आणि त्यांना पापही लागते. हे बोलतांना नेहमी लक्षात ठेवा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

राजकारण्यांनो, हे लक्षात घ्या !

राजकारण्यांनो, हे लक्षात घ्या !

‘जनतेला पैसे देऊन किंवा खोटी आश्‍वासने देऊन निवडून येण्यापेक्षा ईश्‍वराला प्रसन्न करून त्याच्या आशीर्वादाने निवडून आल्यास जनतेलाच नव्हे, तर प्राणीमात्रांनाही खर्‍या अर्थाने सुखी करता येईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले