निवडणुका लढवणार्‍यांनी हे लक्षात घ्या‍वे !

‘अनंत कोटी ब्रह्मांडांवर राज्य करायला ईश्‍वराला निवडणूक लढवावी लागत नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा गुरुपौर्णिमेनिमित्त साधकांना दिलेला संदेश !

‘गुरुपौर्णिमा हा गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि गुरुकार्याच्या वृद्धीसाठी त्याग करण्याचा संकल्प दिवस असतो. व्यापक स्वरूपाचे गुरुकार्य म्हणजे हिंदु धर्माचे कार्य आणि सध्याच्या काळानुसार व्यापक गुरुकार्य म्हणजे धर्मसंस्थापनेचे कार्य अर्थात् हिंदु राष्ट्र संस्थापनेचे कार्य !

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यासाठी समष्टी साधना आवश्यक ! 

‘व्यष्टी साधनेत एकाच देवतेची उपासना असते; पण समष्टी साधनेत अनेक देवतांची उपासना असते. लष्करात पायदळ, रणगाडे, हवाईदल, नाविकदल इत्यादी अनेक विभाग असतात. त्याप्रमाणे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या समष्टी कार्यात अनेक देवतांची उपासना, यज्ञ-याग इत्यादी करावे लागते.’

बोलतांना शिव्या देऊ नये !

‘नेहमीचे बोलतांना आणि भाषणात शिव्या देणार्‍यांच्या बोलण्याची, भाषणाची परिणामकारकता तमोगुण वाढल्याने अल्प होते आणि त्यांना पापही लागते. हे बोलतांना नेहमी लक्षात ठेवा !’

हा दिव्याखाली अंधार नव्हे काय !

‘राजकारणी, बुद्धीप्रामाण्यवादी किंवा वैज्ञानिक यांच्यामुळे विदेशी भारतात येत नाहीत, तर संतांमुळे, तसेच अध्यात्म आणि साधना शिकण्यासाठी येतात. तरीही हिंदूंना संत अन् अध्यात्म यांचे मूल्य कळलेले नाही.’

अध्यात्माचे महत्त्व न जाणणार्‍या शासनकर्त्यांमुळे देशाचे वाटोळे झाले !

‘अध्यात्म सोडून एक तरी विषय ‘सात्त्विक, सज्जन, धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी कसे व्हायचे’, हे शिकवतो का ? तसे नसतांना अध्यात्म सोडून अन्य सर्व विषय शिकवणार्‍या स्वातंत्र्यापासूनच्या ७५ वर्षांतील भारतातील आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी देशाचे वाटोळे केले आहे.

सर्वधर्मसमभाववाले यांचे सत्य स्वरूप !

‘सर्वधर्मसमभाव’ म्हणणारे आंधळे, बहिरे आणि मंदबुद्धीचे आहेत अन् त्यांच्यात सत्य जाणून घ्यायची इच्छाही नाही.’ 

धर्मद्रोह्यांमुळे भारत बलहीन झाला !

‘धर्मद्रोही हे देशद्रोही आहेत; कारण धर्मामुळेच देशात सामर्थ्य येते. याचे उदाहरण म्हणजे जगातील सर्व देशांना काळजी करायला लावणारे इस्लामी देश. याउलट धर्मद्रोह्यांमुळे देश बलहीन होतो, उदा. भारत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

‘चारित्र्यसंपन्न राष्ट्र’ हे आदर्श राष्ट्र

‘अश्‍लील चित्रपट, ‘पब ’, ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ यांसारख्या गोष्टींना शासनकर्त्यांनी मान्यता दिल्याने राष्ट्रातील जनतेचे चारित्र्य नष्ट होत आहे. ‘रामराज्य’ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘हिंदवी स्वराज्य’ आदर्श होते; कारण ती राज्ये चारित्र्यसंपन्न होती.

‘स्‍वभाषाभिमान बाळगणे’, हा हिंदु राष्‍ट्रात धर्मच असेल !

‘छत्रपती शिवाजी महाराज आणि स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांनी भाषाशुद्धी चळवळ राबवून हिंदूंमध्‍ये स्‍वभाषाभिमान जागवला. स्‍वभाषाभिमान हा राष्‍ट्राभिमानाचा पाया आहे. स्‍वातंत्र्योत्तर काळातील शासनकर्त्‍यांनी याकडे दुर्लक्ष केल्‍यामुळे हिंदूंचे स्‍वभाषाप्रेमासह राष्‍ट्र आणि धर्म प्रेमही नष्‍ट होत चालले आहे.