साम्यवाद हा शब्द भविष्यात पृथ्वीवरून नाहीसा होण्याचे कारण

‘साम्यवाद’ या शब्दाला अनुसरून कुठेही ‘साम्य का नसते ?’, यासंदर्भातही साम्यवाद्यांना जिज्ञासा नसते; म्हणून मुळातील कारणे, उदा. प्रारब्ध, वाईट शक्तींचा त्रास, साधना इत्यादी त्यांना कळत नाही. त्यामुळे ही कारणे दूर करण्यास ते साहाय्य कसे करू शकतील ? म्हणूनच लवकरच ‘साम्यवाद’ हा शब्द पृथ्वीवरून नाहीसा होईल.’

गुन्हेगारी टाळण्याचा एकमेव उपाय म्हणजे आध्यात्मिक साधना शिकवणे !

‘भ्रष्टाचार, बलात्कार, गुंडगिरी, हत्या, राष्ट्रद्रोह, धर्मद्रोह इत्यादी गुन्हे होऊ नयेत म्हणून शाळेत, महाविद्यालयात आणि समाजात स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या गेल्या ७७ वर्षांत एका तरी सरकारने शिक्षण दिले का ? न दिल्यामुळे कोट्यवधी गुन्हे झाले आहेत आणि होतही आहेत.

मृत्यूनंतर स्वर्गलोकी किंवा मोक्षाला जायचा विचार न करता ईश्वरी कार्यासाठी पुन्हा पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी तयार व्हा !

‘मृत्यूनंतर मला स्वर्गलोकी किंवा मोक्षाला जायचे आहे’, असा विचार अनेकांचा असतो. त्यांनी लक्षात घेतले पाहिजे की, ईश्वर त्याच्या कार्यासाठी पृथ्वीवर पुनःपुन्हा जन्म घेतो. आपणही त्यासाठी तयार असले पाहिजे.’

हिंदु धर्मज्ञानाचे अद्वितीयत्व !

‘पाश्चात्त्य विज्ञान केवळ तत्कालीन सुख मिळण्याची दिशा दाखवते, तर हिंदु धर्मातील ज्ञान चिरंतन आनंद मिळवण्याची दिशा दाखवते.’ 

स्त्रियांनी अंतर्मुख होणे आवश्यक !

‘कुठे पतीबरोबर थोडा वाद झाला की, घटस्फोट घेणार्‍या हल्लीच्या पत्नी, तर कुठे पतीच्या निधनानंतर त्याच्याशी एकरूप झाल्याने जोहार करणार्‍या, म्हणजे देह अग्निसमर्पण करणार्‍या पद्मावती राणी आणि तिच्या सोबतच्या १६ सहस्र राजपूत स्त्रिया !’

स्वभाषाप्रेम नष्ट करणार्‍या राजकारण्यांना देव क्षमा करणार नाही !

‘छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भाषाशुद्धी चळवळ राबवून हिंदूंमध्ये स्वभाषाभिमान जागवला. स्वभाषाभिमान हा राष्ट्राभिमानाचा पाया आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील शासनकर्त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हिंदूंचे स्वभाषाप्रेमासह राष्ट्र आणि धर्म प्रेमही नष्ट होत चालले आहे.

हिंदूंची दैनावस्था होण्यामागे हे आहे कारण !

‘चर्च आणि मशीद येथे धर्मशिक्षण दिले जाते. याउलट मंदिरात केवळ दर्शन घेतात; म्हणून धर्मशिक्षणाच्या अभावी हिंदूंची स्थिती वाईट झाली आहे.’

संशोधन करण्यासंदर्भात आध्यात्मिक उन्नतीचा एक लाभ

‘अध्यात्मात संशोधन करण्यात आयुष्यातील अनेक वर्षे आणि पैसे खर्च करावे लागत नाहीत. देवाला मनातून प्रश्न विचारला की, तात्काळ उत्तर मिळते.’

अभ्यासहीन बुद्धीप्रामाण्यवादी !

‘गाढवाला गुळाची चव काय ?’, ही म्हण सार्थ करणारे बुद्धीप्रामाण्यवादी अध्यात्माचा अभ्यास न करता म्हणतात, ‘यज्ञात वस्तू जाळता कशाला ?’

व्यक्तीस्वातंत्र्यवाल्यांना हे लांच्छनास्पद नव्हे काय ?

‘व्यक्तीस्वातंत्र्यवाल्यांना व्यक्तीस्वातंत्र्यापेक्षा समाजहित आणि राष्ट्रहित अधिक महत्त्वाचे हे कसे समजत नाही ? उद्या त्यांनी व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली चोरी, बलात्कार, भ्रष्टाचार इत्यादी  करणार्‍यांना पाठिंबा दिल्यास आश्चर्य वाटणार नाही.’